Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज आणि उद्या या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

rain and hot
, मंगळवार, 5 एप्रिल 2022 (15:33 IST)
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळेच अनेक शहरात कमाल तापमानाने ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उन्हाची तीव्रता आणि उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने इशारा दिला आहे. राज्याच्या काही भागात येत्या आज आणि उद्या गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, राज्याच्या काही भागात पाऊस होण्याची चिन्हे आहेत. राज्याच्य ाकाही भागात काल पावसाने हजेरी लावली आहे. त्यापाठोपाठ आज आणि उद्या राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आज दिवसभरात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस होण्याचा इशारा आहे. तर, उद्या म्हणजेच, बुधवारी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात अवकाळी पावासाचा अंदाज आहे. यासंदर्भात हवामान विभागाकडून दिल्या जाणाऱ्या माहितीकडे लक्ष ठेवावे, असेही सूचित करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शहरात तुमचा गोठा किंवा तबेला आहे? …तर तुम्हाला होऊ शकतो कारावास