Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संपूर्ण नाशिक शहरात "या" दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

Webdunia
शनिवार, 16 डिसेंबर 2023 (08:04 IST)
पीएससी ग्रॅव्हीटी मेन रॉ वॉटर पाईपलाईनवरील पाणी गळती बंद करणे, शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथे एमबीआर लाईनवर फ्लो मीटर बसविणे व पाणीपुरवठा वितरण विभागातील विविध ठिकाणी दुरुस्तीकामे करण्यासाठी शनिवारी (दि.16) संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसेच रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशी माहिती मनपा पाणी पुरवठा विभागाने दिली असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
 
मनपाचे गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील 132 के.व्ही. सातपुर व महिंद्रा या दोन फिडरवरुन 33 के.व्ही. एच.टी. वीजपुरवठा घेणेत आलेला असुन सदर पंपिंगद्वारे मनपाचे बाराबंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना रॉ. वॉटरचा पुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा नाशिक पश्चिम वितरण विभागास प्रभाग 12 मधील नविन जलधारा वसाहत येथील 20 लक्ष लिटर जलकुंभास बाराबंगला जलशुध्दीकरण केंद्राचे आवारातुन जोडणी करणे, विसेमळा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रोड 1200 मि मी पीएससी ग्रॅव्हीटी मेन रॉ वॉटर पाईपलाईन वरील पाणी गळती बंद करणे, शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथे एमबीआर लाईनवर फ्लो मीटर बसविणे व पाणीपुरवठा वितरण विभागातील विविध ठीकाणचे दुरुस्तीकामे कामे करावयाची आहेत.
 
तसेच मनपाचे मुकणे रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथुन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी 33 के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. सदरचे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये 220 केव्ही सीटी टेस्ट करणे, होईलसं  सर्व इनसुलेशन  क्लिनिंग व इतर अनुषंगिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शनिवार पॉवर सप्लाय बंद ठेवला जाणार आहे.
 
गंगापुर धरण व मुकणे धरण येथुन सदर कालावधीत पंपीग करता येणार नसल्याने दरम्यान मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार असल्याने संपूर्ण नाशिक शहरास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

Edited by -Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिले उत्तर

LIVE: पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

मेंढरमध्ये लष्कराचे वाहन कोसळले पाच जवानांचा मृत्यू,अनेक जवान जखमी

पुढील लेख
Show comments