Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"आम्हीपण बृजभूषण अन् योगींसोबत जेवायला बसतो"-संजय राऊत

Webdunia
मंगळवार, 24 मे 2022 (15:48 IST)
मनसे नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबतचा खासदार बृजभूषण यांचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर या फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, आम्हीपण खासदार आहोत, आम्हीपण बृजभूषण अन् योगींसोबत जेवायला बसतो, तुम्ही जरा अभ्यास करत जा." असा टोला त्यांनी राज ठाकरे आणि मनसे नेत्यांवर लावला आहे.
 
बृजभूषण शरण सिंह यांना कोण ओळखत नाही? ते खासदार आहेत. आम्ही एकत्र बसतो, एकत्र जेवतो. फोटो व्हायरल झाले म्हणजे काय झालं? मनसेतील नेत्यांचा अभ्यास कच्चा आहे, त्यांनी संसदेचा अभ्यास करावा,' असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. तसंच एकाच सभागृहात लोक बसतात. आसपास असतात आणि चहापानही करतात. आम्ही योगींसोबतही चहापान करतो, म्हणून काय राज ठाकरेंना अडवण्यासाठी आम्ही योगींनाही रसद पुरवली का? असा खोचक सवाल करत राऊत यांनी मनसेचा समाचार घेतला आहे.

तसेच संजय राऊत यांनी भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. "किरीट सोमय्या हा भ्रष्ट माणूस आहे. त्याला मानहानीचा खटला दाखल केलाय तर त्याला दुसरं कामंच काय आहे? कितीचाही खटला दाखल करू द्या आम्हाला काय फरक पडत नाही." असं राऊत म्हणाले. "ज्याने देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी संबंधित विक्रांत घोटाळा केला तो काय मानहानी करणार? तो आरोपी आहे, जामीनावर सुटलाय तो, तोंडानेच बोलतोय की दुसऱ्या कोणत्या अवयवाने बोलतोय काय माहिती?" अशी बोचरी टीका राऊतांनी सोमय्या यांच्यावर केली आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments