Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"अजूनही वेळ गेलेली नाही..." असं का म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

Webdunia
सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (21:10 IST)
आज भाजपकडून शक्तिप्रदर्शन करत कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने  यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र, यावेळी मुक्ता टिळक  यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी का देण्यात आली नाही? अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. यावरून भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांनी, "वेळ आहे उमेदवार बदलता येईल" असे सूचक विधान केले. त्याआधी पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, "48 तासांमध्ये उमेदवार बदलतो, निवडणूक बिनविरोध करणार का?" असे आव्हान महाविकास आघाडीला केले होते.
 
आज चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर टिळक कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी दिली जाईल. चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे नेतृत्व विचार करेल. त्यांची भूमिका पक्षाला मान्य आहे. महाविकास आघाडीने आज तसे कळवले तर उद्याचा दिवस बाकी आहे. उमेदवार बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेता येईल," असे म्हणत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments