Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लाल परीचा प्रवास महागणार?

Webdunia
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (08:38 IST)
पेट्रोल -डिझेल रोजच नवा उच्चांक गाठत आहेत, तर दुसरीकडे महागाईमुळे खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. अशा अनेक कारणांमुळे एसटी महामंडळ देखील लाल परीच्या तिकीट दरांत वाढ करण्याची शक्यता आहे आणि याचाच फटका आता सर्वसामान्यांना बसणार आहे.

कोरोना काळात लाॅकडाॅऊनमुळे एसटीला प्रचंड नुकसान सहन करावे लागले. यामध्ये साधारण 12 हजार कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समोर आले आहे. तोटा पत्करून सुद्धा पेट्रोल -डिझेलचे वाढते दर, टायरचे दर, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि सुटे भाग यांचे वाढलेले दर अशा अनेक आर्थिक कोंडीला महामंडळ सामोरे जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच तिकीटदरांत तब्बल 17 टक्क्यांनी वाढ होणार आहे. हा प्रस्ताव खरंतर 4 महिन्यांपूर्वी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता मात्र तो काही कारणास्तव मंजूर झाला नाही. आता मात्र हा प्रस्ताव नव्याने प्राधिकरणाकडे सोमवारी सादर करण्यात येणार आहे. त्याआधी एसटी महामंडळाचे चेअरमन अनिल परब यांची प्रस्तावावर सही घेण्यात येणार आहे.

दरम्यान, या दरवाढीला विविध संघटनांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. सोमवारी याबाबत प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यानंतरच एसटी महामंडळ नेमकी किती दरवाढ करणार, याबाबतची माहिती समोर येईल असे सांगण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments