Festival Posters

सेल्फी काढताना पाय घसरून महिलेचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 30 डिसेंबर 2023 (10:45 IST)
सेल्फी काढताना अनेकदा अपघात घडत असतात. तरीही लोक सेल्फी काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. असेच काहीसे घडले आहे एका दांपत्यासोबत.लग्नानंतर फिरायला निघालेल्या दांपत्या सोबत असे काही घडेल त्याची कोणीच कल्पना केली नसेल. सेल्फी पॉईंटवरून सेल्फी काढताना पाय घसरून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना प्रबळगडावर घडली आहे. शुभांगी विनायक पटेल असे या मयत महिलेचे नाव आहे. 

शुभांगी पटेल आणि विनायक पटेल यांचे वीस दिवसांपूर्वी लग्न झाले असून ते दोघे फिरायला लोणावळा येथे गेले होते. नंतर ते 28 डिसेंबर रोजी ट्रेकिंगसाठी प्रबळ येथे गेले. प्रबळगडावर सेल्फी घेत असताना शुभांगीचा पाय घसरला आणि ती वरून खाली पडली.  विनायक ने तिला डोळ्यादेखत पडताना पहिले. शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिकांच्या आणि निसर्गमित्रांच्या मदतीने महिलेला बाहेर काढले. तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री आठच्या सुमारास डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.  

Edited By- Priya DIxit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

Tata ची सर्वात परवडणारी कार लाँच, Tata Tiago 2026 Facelift मध्ये ६ एअरबॅग्ज आणि ३६०° कॅमेरा वैशिष्ट्यांचा समावेश

विक्रमी नफा होऊनही, मुकेश अंबानी यांनी सलग सहाव्या वर्षी पगार घेतलेला नाही

बहुतांश शेतकरी सोयाबीन पेरताना या चुका करतात; उत्पादन वाढवण्यासाठी जूनपूर्वीच करा ही सोपी तयारी

रिलायन्सचे सरकारी तिजोरीत ₹२.१६ लाख कोटींचे योगदान, सीएसआर खर्चातही वाढ

रिलायन्सने केली एक लाख हून अधिक नवीन नोकऱ्यांची भरती, हरित ऊर्जा क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

पुढील लेख
Show comments