Marathi Biodata Maker

मुक्त विद्यापीठ : प्रवेशासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Webdunia
शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (08:59 IST)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सध्या सुरु असलेल्या सर्व शिक्षणक्रमांचे प्रवेश २७ जूनपासून सुरु करण्यात आले आहेत. मात्र राज्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता १४ ऑगस्ट पर्यंत विनाविलंब शुल्कासह असलेली मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत (कृषिविज्ञान विद्याशाखेचे शिक्षणक्रम आणि बी.एड. शिक्षणक्रम वगळून) सर्व शिक्षणक्रमांसाठी वाढविण्यात आली आहे.
 
याशिवाय विद्यार्थ्यांना रुपये शंभर विनाविलंब शुल्कासह दि. १ ते १५ सप्टेंबर पर्यंत तर रुपये पाचशे सह दि. १६ ते ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जात असून विद्यार्थ्यांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या संगणकावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार नाही असे विद्यार्थी स्वतः सायबर कॅफेच्या माध्यामतूनही प्रवेश अर्ज भरू शकतात. मुक्त विद्यापीठाची राज्यात ८ विभागीय केंद्रे कार्यरत असून तेथेही प्रवेश घेण्यासाठी मदत मिळू शकते. शिक्षणक्रमांच्या अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या ycmou. digitaluniversity.acअथवा ycmou .ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. विद्यापीठाने दिलेल्या वाढीव प्रवेश मुदतीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. प्रकाश अतकरे यांनी केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

हिंदी विरुद्ध मराठी राजकारण तीव्र, बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपने हिंदी भाषिक मतपेढीवर लक्ष केंद्रित केले

BCCI ने घेतला मोठा निर्णय: मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर, केकेआर बदली खेळाडू शोधणार

मार्चमध्ये ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार का? पीआयबीने सत्य उघड केले

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

मुंबईत प्रेयसीने प्रियकराच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला

पुढील लेख
Show comments