Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमदार गुलाबराव पाटील यांना अटक

Webdunia
शुक्रवार, 17 जून 2016 (11:08 IST)
शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी अर्जुन पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी गुलाबराव पाटलांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र तो फेटाळून लावला.

त्यानंतर गुलाबराव पाटील स्वत: जळगावमधील एमआयडीसी पोलिसांना शरण आले. पोलिसांनी आज त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं. कोर्टानं त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जळगाव तालुक्यातील म्हसावद इथं पद्मालय शिक्षण प्रसारक संस्था आहे. 1991 साली या संस्थेची स्थापन झाली. त्यानंतर 2012 पर्यंत संस्थेच्या 6 सभासदांचं निधन झालं. मात्र 20 एप्रिल 2008 साली गुलाबराव पाटील यांनी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली. आणि 18 ऑगस्ट 1996 साली मृत पावलेले सभासद महारु काशीनाथ बेलदार सभेला हजर असल्याचं कागदोपत्री दाखवलं. आणि संस्थेची नवीन कार्यकारिणी तयार केली. असा त्यांच्यावर आरोप आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

विरोधानंतरही मुंबईतील 221 पोलिसांच्या बदल्या

MVA मधील सीट वाटपावरून वाद कसा संपेल? शरद पवार यांनी सुचवला मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, अयोध्या दीपोत्सवाचाही उल्लेख केला

स्पेनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे 95 जणांचा मृत्यू, वादळ येणे बाकी

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का, रवी राजा यांनी राजीनामा का दिला?

पुढील लेख
Show comments