Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकनाथ खडसेंना शिवसैनिकांकडून मोबाईल भेट

Webdunia
गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (11:41 IST)
दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मोबाईलची बिले भरायला पैसे असतात मग वीज बिल का भरत नाही, असे बोजरे वक्तव्य करणारे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना   मुंबईतील शिवसैनिकांनी मोबाईल भेट देऊन जाहीर निषेध केला. 
 
शिवसेना कार्यकर्ते जितेंद्र जानावळे यांनी एक नवा मोबाईल खडसे यांना स्पीड पोस्टने पाठवून दिला. उषा भोजने, सुनील मोरे, प्रफुल्ल घरत, चिंतामणी निवासे, सरिता इंगळे आदी शिवसैनिकांनी जानावळे यांच्यासह खडसेंचा निषेध केला.
 
दरम्यान,महसुलमंत्री एकनाथ खडसे यांनी मराठवाडा व विदर्भातील दुष्काळी भागात दौर्‍यावर असताना शेतकर्‍यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत आले आहेत. मोबाईलचे वक्तव्य सगळ्या वृत्तवाहिन्यांनी दाखविल्यानंतर एकनाथ खडसे कमालीचे संतापले आहेत. दरम्यान, याच मुद्यांवरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खडसेंना खिंडीत पकडले आहे. त्यामुळे खडसेंचा तीळपापड झाला आहे. त्यामुळे खडसेंनी भुईमूग खाली उगवतो की वर येतो ही माहित नसणा-यांनी माझ्यावर टीका करू नये अशी टीका उद्धव यांच्यावर केली होती. 
 
जितेंद्र जानावळे यांनी सांताक्रुझ पोस्ट कार्यालयातून स्पीड पोस्टने खडसेंच्या नावे मंत्रालयाच्या पत्त्यावर पाठवून दिला. खडसेंना हा फोन बुधवारी अथवा गुरुवारी मंत्रालयात मिळेल असे सांगितले जात आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments