Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऐश्वर्य माझा मुलगा नाही: जयदेव ठाकरे

Webdunia
गुरूवार, 21 जुलै 2016 (10:10 IST)
मुंबई- ‘मातोश्री’वर पहिल्या मजल्यावर राहत असलेला ऐश्‍वर्य हा माझा मुलगा नसून, स्मिताचा मुलगा आहे. मी त्याचा पिता नाही असे खळबळजनक विधान बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात केले.
 
मला याविषयी काही सांगायचे आहे आणि ते रेकॉर्डवर आणायचे आहे, असे विधान केल्यानंतर यापुढील सुनावणी इन कॅमेरा करण्याचा निर्णय न्यायालयानेच घेतला.
 
बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छापत्रास त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव यांनी आव्हान दिले असून, त्याची सुनावणी न्या. गौतम पटेल यांच्यापुढे सुरू आहे. ऐश्‍वर्य यास बाळासाहेबांनी आपला वारस म्हणून मातोश्री बंगल्यातील पहिला मजला दिला आहे. जयदेव यांच्या पूर्वपत्नी स्मिता या ऐश्‍वर्यची आई आहेत. मात्र, आपण ऐश्‍वर्यचे पिता नसल्याचे जयदेव यांनी सांगितले.  जयदेव ठाकरेंच्या या विधानानंतर कोर्टानेच तत्काळ सुनावणी थांबवून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बाहेर जायला सांगितले आणि पुढची सुनावणी इन कॅमेरा सुरू झाली.
 
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून जयदेव व उद्धव यांच्यात वाद सुरू झाला. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रोहित कपाडिया यांनी जयदेव यांची उलटतपासणी घेतली.
 
न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर जयेदव यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठले व तुम्हाला काही सांगायचे आहे का, असे विचारले. त्यांनी पाऊस खूप छान पडतोय, असे सांगून सुनावणीविषयी बोलणे टाळले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments