Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जे रावण आहेत, तंचा विनाश अटळ : राधे माँ

Webdunia
सोमवार, 10 ऑगस्ट 2015 (12:02 IST)
माझी कोणाबद्दलही तक्रार नाही. जे माझ्या विरोधात कटकारस्थान करत आहेत. जे रावणासारखे वागत आहेत त्यांचा विनाश अटळ आहे, अशी प्रतिक्रिया देत राधे माँ यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
 
राधे माँ यांच्याविरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात निक्की गुप्ता या महिलेने हुंडय़ासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी राधे माँ यांच्यासह निक्की गुप्ता यांच्या कुटुंबातील पाचजणांना समन्स बजावले आहे. या पाचही जणांचे जबाब नोंदविण्यात आल्यानंतर राधे माँ यांनाही पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राधे माँ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मी निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
 
मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असेल तर त्याबाबत मला काहीही माहित नाही. कोणी कितीही म्हटले तरी माझ्या नजरेतून, ईश्वराच्या नजरेतून पाहिल्यास मी निदरेष आहे. जे माझ्यावर प्रेम करतात, जे माझे खरे भक्त आहेत त्यांच्या दृष्टीने मी योग्यच आहे, असे राधे माँ यांनी नमूद केले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments