Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोलिसाकडून पोलिस महिलेवर बलात्कार

Webdunia
सोमवार, 30 जून 2014 (17:24 IST)
रायगड जिल्ह्यात पोलिस विभागात काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. प्रशिक्षणार्थी पोलिस महिलेवर प्रशिक्षण देणार्‍या पोलिसांने बलात्कार केल्याचा धक्कदायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. गेल्या दीड दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. या घटनेवरून पोलिस विभागातील महिलांचा सुरक्षितेतचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील आपल्या भाषणांमध्ये महिला सुरक्षेची सातत्याने हमी देतात. परंतु त्यांच्या पोलिस विभागात कुंपण शेत खात असल्याचे प्रकार खुलेआम घडत आहेत.

म‍िळालेल्या माहितीनुसार, अलिबागमध्ये पोलिस प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणार्‍या युवतीवर खाकी वर्दीतल्या एका नराधमाने बलात्कार केला. नागेश गावडे याचं लग्न झालेलं असतानाही त्यानं पीडित युवतीला लग्नाचं अमिष दाखवून गेल्या दीड-दोन वर्षांपासून शारिरीक संबंध ठेवले. संतापजनक बाब म्हणजे त्याची व्हिडिओ क्लिप तयार करून ती आपल्या मित्रांना पाठवली. झाला प्रकार लक्षात आल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी या तरुणीने अलिबाग पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दिली. मात्र, तिच्या या तक्रारीकडे वरिष्ठांनी साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे वरीष्ठांबाबतही संक्षयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. .

आरोपी सध्या अलिबाग पोलिसांच्या ताब्यात असला, तरी महिन्यांपूर्वी तक्रार देवूनही पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यानं गुन्ह्याचा तपास जिल्ह्याबाहेरच्या सक्षम यंत्रणेनं करावा अशी मागणी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments