Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माळशेज घाटात एसटी कोसळली; 37 प्रवासी ठार

वेबदुनिया
WD
माळशेज घाटातील दरीत विठ्ठलवाडी -अहमदनगर एसटी बस आज (गुरुवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास कोसळून झालेल्या अपघातात 37 प्रवाशांचा मृत्यु झाला आहे. मृतात 19 महिला व 18 पुरूषांचा समावेश आहे. तसेच चालक आणि वाहकाचाही मृत्यु झाला आहे. बसमध्ये 43 प्रवाशी प्रवास करीत होते. जखमीना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

घाटात एका अज्ञात ट्रकची धडक बसून बस दरीत कोसळ्याचे प्रत्यक्षदर्शीनी पो‍लिसांना सांगितले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान मदतकार्य करीत आहेत. महाराष्‍ट्र राज्य परिवनहन मंडळातर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक तीन लाख रुपये मदत जाहीर केली आहे. ही माहिती एसटी मंडळाचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी दिली आहे.

बस 80 फुट उंचीवरून खाली कोसळली. त्यामुळे एसटी बस चकणाचूर झाली आहे. मुरबाडवरुन ही बस अहमदनगरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments