Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री बनले जपानचे ‘डॉक्टर’

Webdunia
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2015 (10:35 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या ओसाका सिटी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट देण्यात येणार असून, अशी डॉक्टरेट मिळविणारे फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.
 
ओसाका सिटी विद्यापीठातर्फे दिली जाणारी ही सर्वोच्च पदवी असून, गेल्या २० वर्षांत आतापर्यंत १० लोकांनाच प्रदान करण्यात आली आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रात परिवर्तन घडवू पाहात आहेत. अडथळ्यांवर मात करून ते करीत असलेल्या प्रयत्नांची विद्यापीठाने प्रशंसा केली आहे.
 
या पदवीसाठी संबंधित मानकर्‍यांचा ओसाका सिटी विद्यापीठ अथवा ओसाका शहराशी वैशिष्ट्यपूर्ण संबंध अपेक्षित असतो. पश्चिम जपानमधील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा कन्साई प्रांतातील प्रमुख शहर ओसाकाची मुंबई शहराशी औद्योगिक क्षेत्रात भागीदारी आहे. फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात ओसाकाला भेट दिली होती.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments