Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधींची आज औरंगाबादेत जाहीर सभा

Webdunia
बुधवार, 5 मार्च 2014 (09:51 IST)
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची आज (बुधवारी) दुपारी एक वाजता जाहीर सभा होणार आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर दुपारी जाहीर सभा होत आहे. राहुल यांच्यासोबत राज्यांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील.
 
राहुल यांचे सकाळी 9 वाजता औरंगाबादेत विमानाने आगमन होईल.तेथून ते शिरपूरकडे रवाना होतील. दुपारी 12 वाजता ते परत शहरात येतील. सुभेदारी विश्रामगृहात भोजन घेतल्यानंतर 1 वाजता सभास्थळी उपस्थिती देतील. पुन्हा धुळ्याकडे रवाना होतील.
 
यासभेला राज्याच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले आहे. यात अशोक चव्हाण आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा समावेश राहणार आहे. याशिवाय महाराष्‍ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष मा‍‍णिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील,शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, राज्यमंत्री डी.पी.सावंत, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी नेते उपस्थित राहणार आहेत

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments