Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेखाच्या घरात डेंग्यू तपासणी पथकाला अडविले

Webdunia
बुधवार, 30 सप्टेंबर 2015 (11:41 IST)
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांच्या घरात डेंग्यू तपासणीसाठी आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग पथकाला प्रवेश नाकारण्यात आल्याने रेखा यांना महापालिका निगम 488 कलमानुसार नोटिस बजावली गेली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बांद्रा येथे मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने सेलिब्रिटींच्या घरी डेंग्यू तपासणीसाठी मोहीम आखली होती. यात सचिन तेंडुलकर, रिना रॉय, आमीर खान, फरहान अख्तर यांच्या घरी तपासणी केली गेली. मात्र रेखा घरी नसल्याने त्यांच्या घरात या पथकाला जाऊ दिले गेले नाही. त्या संदर्भात त्यांना कलम 488 नुसार नोटिस बजावण्यात येत आहे. या नियमानुसार पथक रेखा यांच्या घरात जबरदस्तीनेही घुसू शकणार आहे. नोटिस घेतली गेली नाही तर ती त्यांच्या दारावर चिकटवली जाणार आहे. 
 
दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या घरातील तपासणीत तेथे डेंग्यूचा प्रादुर्भाव आढळला असल्याने त्यांनाही नो‍टीस बजावली गेली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments