Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवारांवर शिवसेनेकडून शेलक्या भाषेत टीकास्त्र

Webdunia
मंगळवार, 21 ऑक्टोबर 2014 (12:01 IST)
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शिवसेनाचे मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्रातून शेलक्या भाषेत टीका करण्यात आली आहे. कालपर्यंत भाजपवर टीका करणारे, त्यांना जातीयवादी व हाफचड्डीवाल्यांचा पक्ष म्हणणारे आता या हाफचड्डीच्या प्रेमात पटेल पडले आहेत. शरद पवार- प्रफुल्ल पटेलांनी बाजारातून नवी हाफचड्डी विकत आणली की स्वत:च्या फुल पॅण्टीला कैची मारून त्याची हाफचड्डी केली? अशा शब्दात टीका करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली होती. परंतु निकाल लागल्यानंतर भाजप हा राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर राष्ट्रवादीने बिनशर्त पाठींबा देऊ केला. त्यावर शिवसेनेने शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. 
 
मतमोजणीच्या आदल्या दिवशी भाजपचे नेते एकनाथ खडसे जाहीरपणे सांगतात की, ‘काही झाले तरी सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही!’ बहुधा खडसे यांचे खडे बोल राष्ट्रवादीच्या कानात शिरले नसतील किंवा जन्मत:च कोडगेपणा अंगी भिनल्याने राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांनी निकालांचा गडगडाट सुरू असतानाच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून टाकला. 
 
'पवार-पटेल भाजप प्रेमाचे चंदन घासत आहेत ते काय महाराष्ट्रहितासाठी? आपली भ्रष्टाचाराची प्रकरणे दाबता आली तर पाहावीत हाच उदात्त हेतू दिसतोय. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभांतून ‘काका-पुतण्यांनी महाराष्ट्र कसा लुटला!’ याची हाळी दिली व पवारांचा पक्ष हा ‘नॅचरल करप्ट पार्टी’ असल्याचे सांगितले. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments