Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साहित्यिकांसाठी ‘प्रतिभा संगम’ नाशकात

Webdunia
बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (10:07 IST)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने १४ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील विद्यार्थी साहित्यिकांसाठी प्रतिभा संगम या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाची सुरुवात केली आहे. प्रतिभा संगम मुळे योग्य वयात विद्यार्थ्यांच्या साहित्य जाणिवा समृद्ध होतात, दर्जेदार लेखनासाठी प्रोत्साहन मिळते. प्रतिभावान विद्यार्थी साहित्यिकांना प्रस्थापित साहित्यिकांबरोबर मुक्तसंवाद साधता येतो. विद्यार्थ्यांच्या साहित्यावर मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीने खुली चर्चा होऊन मार्गदर्शन मिळते. अशा या अभिनव साहित्य संमेलनाचे १५वे पुष्प नाशिक येथे दि. २३,२४,२५ सप्टेंबर या दिवसांत गुंफले जाणार आहे. रावसाहेब थोरात सभागृहात होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कादंबरीकार श्री. विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलनाच्या समारोपास प्रमुख अतिथी अभिनेत्री पल्लवी जोशी उपस्थित राहणार आहेत. ३ दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यातील सुमारे ५०० विद्यार्थी साहित्यिक आणि अनेक नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती निमंत्रक प्रा. डॉ. गिरीश पवार आणि स्वागत सचिव श्री.दिनेश रणदिवे यांनी दिली.
 
नाशिक मध्ये प्रतिभा संगम पहिल्यांदाच होत असून या साठी निर्माण करण्यात आलेल्या स्वागत समितीचे कार्याध्यक्ष प्रथितयश उद्योजक श्री.महेश दाबक आहेत तर श्री. दिनेश रणदिवे हे स्वागत समितीचे सचिव आहेत. या पूर्वी अंमळनेर, रत्नागिरी, पुणे, ठाणे, गोवा, जळगाव, परभणी अशा विविध ठिकाणी १४ संमेलने संपन्न झाली आहेत.
 
या ‘प्रतिभा संगम’मध्ये राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी-साहित्यिकांना खुले निमंत्रण देण्यात आले आहे. एका महाविद्यालयातील कितीही विद्यार्थी संमेलनात सहभागी होऊ शकतात. कविता, कथा, वैचारिक लेख, पथनाट्य, ललितलेख, लघुपट या साहित्य प्रकारांचा समावेश प्रतिभा संगम मध्ये आहे.
 
प्रतिभा संगम साहित्य संमेलन स्थळास महाकवी वामनदादा कर्डक नगर असे नाव देण्यात येणार आहे. संमेलनाच्या व्यासपीठास निसर्गकवी नरेश पाटील यांचे नाव देऊन श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. तर प्रदर्शनी कक्षास स्व. मुरलीधर खैरनार यांचे नाव देण्यात येणार आहे.
 
 दि. २३ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून संमेलनस्थाना-पर्यंत साहित्यदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर जाहीर उदघाटन समारोह, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दि २४ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन वाडःमय मंडळ प्रमुखांचे, प्राध्यापकांचे एकत्रीकरण व चर्चा, श्री. अशोक बागवे या प्रसिद्ध साहित्यिकाची प्रकट मुलाखत झाल्यानंतर; कविता/कथा/वैचारिक लेख/पथनाट्य लेखन/अनुदिनी लेखन (Blogs)/लघुपट या विषयात लेखन करणारया विद्यार्थ्यांची गटशः चर्चा-सादरीकरण व मार्गदर्शन होणार आहे.
 
दि.२५ सप्टेंबर रोजी निवडक प्रतिनिधींची परिचर्चा, हिंदी भाषेतून प्राचार्य डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांचे व्याख्यान, श्री, नंदेश उमप यांचे आविष्कार या विषयावर सप्रयोग व्याख्यान आणि समारोप व पारितोषिक वितरण होणार आहे.
 
यासाठी राज्यातील साडेतीन हजार महाविद्यालयात प्रवेश अर्ज पाठविण्यात आले असून प्रतिभा संगमच्या संकेतस्थळावर हे उपलब्ध आहेत. प्रवेश पत्र न पाठविलेले विद्यार्थी सुद्धा संमेलनात सहभाग घेऊ शकतात. यासाठी विद्यापीठ विभाग निहाय विद्यार्थ्यांची संपर्क रचना तयार करण्यात आली आहे. त्यात मकरंद कुलकर्णी (मुंबई)-९२२०४४५४९८, मयुरेश्वर कुळकर्णी (विदर्भ)-९७६६७२०३५६ यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी ८६९८३८९९१५ या भ्रमणध्वनीवर अथवा pratibhasangam15@gmail.com वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

No shave November नो शेव्ह नोव्हेंबर म्हणजे काय, जो जगभरातील पुरुष साजरा करतात?

उद्या त्यांचा पक्ष फोडू शकतात, संजय राऊत यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सल्ला

गॅस सिलिंडरच्या दरात मोठी झेप, एका रात्रीत किंमती वाढल्या

महाराष्ट्र निवडणुकीसाठी काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची नियुक्ती केली

बंडखोरांवर भाजप कारवाई करणार का? अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने प्रश्न उपस्थित केला

पुढील लेख
Show comments