Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Relationship Tips : हे तीन शब्द मैत्रिणीला बोलणे टाळा, नातं संपुष्टात येईल

Relationship Tips
Webdunia
गुरूवार, 9 जून 2022 (10:09 IST)
Relationship Tips: नात्यातील एक छोटासा गैरसमज तुम्हाला तुमच्या जोडीदारापासून दूर ठेवू शकतो. अनेकवेळा लोक कळत- नकळत अशा अनेक गोष्टी बोलतात ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावते. अशा परिस्थितीत जोडीदाराशी बोलताना काही शब्द जपून वापरा नाहीतर आपलं नातं संपुष्टात येऊ शकतं. . 
 
कोणत्याही नात्यात, लोक त्यांच्या जोडीदाराच्या तोंडून तीन जादूचे शब्द (आय लव्ह यू) ऐकण्यास उत्सुक असतात. नातं घट्ट होण्यासाठी तुमचं प्रेम अनेकदा व्यक्त करणंही खूप गरजेचं आहे. यामुळे नात्यात ताकद आणि नवीनता येते. या तीन  जादुई शब्दांमुळे तुमचं नातं बहरून निघते , त्याचप्रमाणे हे तीन शब्द असे आहेत जे तुमचे चांगले नाते खराब करू शकतात. 
 
अनेकवेळा लोक नकळत आपल्या पार्टनरला अशा गोष्टी सांगतात, ज्यामुळे पार्टनरला वाईट वाटू शकते. तुम्ही जे बोललात ते तुमच्यासाठी किरकोळ असले तरी त्याचा तुमच्या जोडीदारावर वाईट परिणाम होऊ शकतो. ओके, फाईन आणि गुड असे काही शब्द आहे जे कोणत्याही नात्यात नकारात्मकता वाढवू शकतात. 
 
हे महत्वाचे आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असता तेव्हा हे तीन शब्द वापरणे टाळा, अन्यथा तुमचे नाते तुटण्याच्या मार्गावर येऊ शकते.  चला जाणून घेऊया.
 
तुम्ही तुमच्या जोडीदाराला "आय एम ओके " किंवा "किंवा ''आय एम फाईन " असे शब्द म्हटल्यास, यामुळे तुमचे नाते हळूहळू संपुष्टात येऊ शकते. या शब्दांचा तुमच्या नातेसंबंधावर कसा परिणाम होतो ते समजून घेऊ या. 
 
1 जोडीदाराला बोलण्यापासून रोखतात-
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी एखाद्या विषयावर बोलत असताना ओके,फाईन  किंवा गुड असे शब्द वापरता तेव्हा तुम्हाला ते प्रकरण तिथेच थांबवायचे आहे किंवा  संपवायचे आहे असे दिसते. असे शब्द तुमच्या जोडीदाराला पुढे बोलण्यापासून रोखतात.  
 
2 तू बरा आहेस न ?
बऱ्याच वेळा काही लोक या शब्दाचा वापर करतात हे शब्द दर्शवतात की बऱ्याच वेळा जोडीदार रागाच्या भरात असे काही शब्द वापरतात. या मुळे नात्यात दुरावा येतो. अशा परिस्थितीत शब्दांचा वापर जपून करावे. त्यांना आपल्या मनातले गुपित सांगा जेणेकरून आपल्या दोघात गैरसमज होऊ शकतात. आणि नात्यात दुरावा येतो. 
 
3 संवाद न होणे- 
एकमेकांशी संवाद करणे प्रत्येक नात्यात आवश्यक आहे. जेव्हा आपण ओके, फाईन, गुड असे शब्द वापरतात तर समोरचा व्यक्ती विचारात पडतो की आपल्याला त्याच्याशी बोलण्यात काहीही रस नाही. बऱ्याचवेळा काही जण आपल्या जोडीदाराशी काही गोष्टी शेअर करत नाही आणि काही गोष्टी लपवतात. जर आपल्यालाही आपलं नातं दृढ करायचे आहे तर आपसातील संवाद बळकट ठेवा. आणि ओके, फाईन, गुड या शब्दांचा वापर करणे टाळा. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्री हनुमान चालीसा अर्थ सहित

शनि देवाला तेल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि मंत्रांचे महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या आधी शनीची राशी बदलेल, ३ राशींचे जीवन बदलेल, धन- समृद्धीचा वर्षाव होईल

जातक कथा : दयाळू मासा

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नखांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या

उष्माघात झाल्यावर हे फळ खाल्ल्याने त्वरित आराम मिळेल

चहाचे गाळणे काळे आणि चिकट झाले का? या ट्रिक अवलंबवा

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

पुढील लेख
Show comments