Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उन्हाळ्यात शारीरिक संबंध ठेवताना ही काळजी घ्या

Webdunia
मंगळवार, 28 मे 2024 (17:33 IST)
उन्हाळ्यात जास्त घाम येतो, त्यामुळे धूळ, घाण इत्यादी शरीराला चिकटून राहतात. त्याच वेळी ते जंतू देखील आकर्षित करतात. उन्हाळ्याच्या हंगामात आपली त्वचा बॅक्टेरिया-अनुकूल वातावरण तयार करते, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. उन्हाळ्यात शारीरिक संबंध ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. प्रायव्हेट पार्ट्समध्ये सर्वाधिक घाम येतो आणि त्या भागांमध्ये जंतू देखील सर्वाधिक वाढतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही क्रिया करताना सतर्क नसता, तेव्हा जंतूंची देवाणघेवाण होऊ शकते आणि तुम्हाला आणि तुमच्या जोडीदारामध्ये संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे संबंध ठेवताना काय करावे आणि काय करू नये हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.
 
उन्हाळ्यात संबंध ठेवताना काय काळजी घ्यावी?
हायजीन- उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या जोडीदाराशी संबंध ठेवण्यापूर्वी आणि नंतर योग्य स्वच्छता राखणे फार महत्वाचे आहे. उन्हाळ्यात जास्त घाम येतो, अशा स्थितीत खाजगी भागात संक्रमणास कारणीभूत जंतू वाढू लागतात, त्यामुळे स्वच्छता न ठेवता संबंध ठेवल्यास दोघांनाही संसर्ग होऊ शकतो. अशात संबंध ठेवण्यापूर्वी आणि नंतर आपले अंतरंग क्षेत्र पूर्णपणे स्वच्छ करा आणि जर उन्हाळा असेल तर आपण आंघोळ देखील करावी.
 
प्रोटेक्शन- या दरम्यान प्रोटेक्शन बद्दल लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे. प्रोटेक्शन केवल प्रेग्नेंसी अवॉइड करण्यासाठी नव्हे तर विविध संसंर्गापासून वाचण्यासाठी योग्य ठरते. विशेषकरुन उन्हाळ्यात इंटीमेट एरियामध्ये अधिक घाम सुटतो म्हणून हायजीन मेंटेन केले तरी घाम एक्सचेंज होतो. अशा परिस्थितीत प्रोटेक्शन वापरुन कोणत्याही प्रकारचे जीवाणू योनीमध्ये प्रवेश करू शकत नाहीत याची खात्री करु शकता.
 
शॉवर- या ऋतूत शॉवरखाली संबंध बनवण्याचा वेगळाच आनंद आहे. शॉवर आपल्या शरीरात जंतू वाढण्यापासून प्रतिबंधित करते आणि आपले शरीर पूर्णपणे स्वच्छ आणि घाममुक्त ठेवते. जर स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते खूप चांगले आहे आणि आनंदाच्या दृष्टिकोनातून, शॉवर संबंध हा एक चांगला पर्याय आहे. उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करताना संबंध ठेवल्यानेतुम्हाला ताजेतवाने वाटते आणि तुम्ही त्याचा मनमोकळेपणाने आनंद घेऊ शकता.
 
आइस क्यूब- उन्हाळ्याच्या हंगामात आपण बर्फाच्या तुकड्यांसह शरीराच्या संवेदना देखील एक्सप्लोर करू शकता. साधारणपणे लोक उन्हाळ्यात कूलिंग स्नेहक वापरतात, जे कधीकधी संसर्गाचे कारण बनतात. त्यामुळे ते टाळा आणि नैसर्गिक बर्फाचे तुकडे वापरा. तथापि आपल्या अंतरंग भागात बर्फ थेट लावू नका कारण यामुळे त्वचा जळू शकते. विशेषत: ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी प्रथम सुती कापडात बर्फ गुंडाळावा. त्याच्या मदतीने तुम्ही अनेक स्तनाग्र, ओठ, बेली बटण यासारख्या इरोजेनस झोनला उत्तेजित करू शकता. त्यामुळे उत्तेजना वाढते.
 
बॉडी हायड्रेटेड ठेवा- उन्हाळ्यात शरीरात सहज निर्जलीकरण होते. संबंध ठेवताना शरीराला घाम येतो, त्यामुळे शरीराला पाण्याची गरज भासू शकते. अशा स्थितीत संबंध ठेवण्याच्या आधी आणि नंतर पुरेसे पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील.
 
उन्हाळ्यात कशा प्रकाराचे शारीरिक संबंध टाळावे?
उन्हाळ्याच्या हंगामात आनंद वाढवण्यासाठी बरेच लोक आइस्क्रीम किंवा इतर कोल्ड ड्रिंक्सचा सहभाग करतात. ज्यामध्ये ते आईस्क्रीमसह अंतरंग क्षेत्र उत्तेजित करतात. तथापि हे अत्यंत धोकादायक असू शकते. हे करू नये कारण या पदार्थांमध्ये साखर असते, जी तुमच्या योनी आणि व्हल्व्हावर बॅक्टेरिया आकर्षित करते, ज्यामुळे यीस्ट संसर्गाचा धोका वाढतो. इतर अनेक प्रकारचे संक्रमण देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात.
 
उन्हाळ्याच्या हंगामात अनेकांना स्विमिंग पूल संबंधाचा आनंद घ्यायचा असतो, परंतु हे तुमच्या अंतरंग क्षेत्रासाठी खूप धोकादायक आहे. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो, विशेषत: जर फुलातील द्रव योनीमध्ये शिरले तर यामुळे मूत्राशयालाही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ही पद्धत पूर्णपणे टाळा.
 
अस्वीकरण : चिकित्सा, आरोग्य संबंधी उपाय, योग, धर्म, ज्योतिष इतर विषयांवर वेबदुनिया मध्ये प्रकाशित लेख व समाचार केवळ आपल्या माहितीसाठी आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

World Art Day 2025 : जागतिक कला दिन

गणपतीच्या नावांवरून बाळासाठी सुंदर आणि यूनिक ११ नावे, अर्थ जाणून घ्या

Summer special थंडगार कैरीच पन्ह, जाणून घ्या रेसिपी

स्टेज झिरो कॅन्सर म्हणजे काय? त्याचे लक्षण काय आहे

सौर ऊर्जा क्षेत्रात करिअर करा

पुढील लेख