rashifal-2026

Sleep Divorce कपल्समध्ये स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Webdunia
शुक्रवार, 17 मे 2024 (16:25 IST)
Sleep Divorce स्लीप डिव्होर्स जोडप्यांमध्ये एक ट्रेंड बनत आहे परंतु त्याचा परिणाम त्यांच्या नातेसंबंधावर देखील होतो. अशाप्रकारे नोकरी करणाऱ्या जोडप्यांना व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे खूप कठीण जाते. यामुळेच बहुतांश वेळ हाणामारीत जातो. जर जोडप्यांमध्ये मतभेद असतील तर तुमच्याकडे एक पर्याय उरतो तो म्हणजे स्लीप डिव्होर्स.
 
स्लीप डिव्होर्स म्हणजे काय?
स्लीप डिव्होर्समध्ये जोडपे त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या सोयीनुसार एकमेकांपासून वेगळे झोपणे पसंत करतात. आपल्या जीवनशैलीत आणि कार्यसंस्कृतीत नवीन बदल झाल्यापासून हे ट्रेंड सुरु झाले आहे. त्याचवेळी याचे दुसरे कारण म्हणजे जोडीदाराचे घोरणे, फोनवर जास्त वेळ घालवणे, नाईट शिफ्ट इत्यादीमुळे दुसऱ्या जोडीदाराची झोप खराब होते. म्हणूनच या समस्येवर उपाय म्हणजे झोपेपुरता घटस्फोट.
 
स्लीप डिव्होर्सचे फायदे
स्लीप डिव्होर्सचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे सध्या जोडप्यांमध्ये ट्रेंड होत आहे आणि वेगाने प्रगती होत आहे. आपले शरीर सक्रिय ठेवण्यासाठी अन्न आणि झोप खूप महत्त्वाची आहे. जर जोडीदारांमध्ये मतभेद असतील तर या दोन्ही गोष्टींचा त्रास होतो. अशाप्रकारे झोपेची पद्धत अवलंबून जोडपे स्वतःला वैयक्तिक जागा देतात, जे खूप महत्वाचे आहे, याशिवाय चांगली झोप पूर्ण होत नाही.
 
स्लीप डिव्होर्सचे तोटे
स्लीप डिव्होर्सचे फायद्यांपेक्षा अधिक तोटे आहेत जे थेट तुमच्या नातेसंबंधावर परिणाम करतात. जोडीदार स्वतंत्रपणे झोपल्यामुळे फिलिंग्स नष्ट होऊ लागतात. जेव्हा भागीदारांमध्ये मतभेद होतात, तेव्हा एकत्र राहून तुम्ही तुमचे विचार एकमेकांशी शेअर करू शकता. जर तुम्ही स्लीप डिव्होर्स घेत असाल तर तुमच्यामध्ये गैरसमज कायम राहू शकतात.
 
जर तुम्ही स्लीप डिव्होर्स घेण्याच्या ट्रेंडमध्ये असाल तर तुमच्यातील प्रेम संपुष्टात येते कारण हे सामान्य आहे की जर तुम्ही वेगवेगळ्या खोलीत झोपत असाल तर हळूहळू प्रेम संपुष्टात येते. या प्रकाराच्या घटस्फोटामुळे जोडप्यांचा आनंद हळूहळू मावळतो. मुलगा असो की मुलगी, ते ऑफिस आणि घरच्या कामात इतके अडकतात की त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी फक्त रात्रीच वेळ मिळतो. अशा प्रकारे स्वतंत्रपणे झोपण्याचा निर्णय तुमच्यासाठी हानिकारक ठरु शकतो.
 
अस्वीकरण: येथे देण्यात आलेली माहिती सामान्य समजुतीवर आधारित आहे. वेबदुनिया याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Lord Vishwakarma Jayanti 2026 भगवान विश्वकर्मा जयंती विशेष नैवेद्य

सुकवलेला नारळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Career Guidance: डिप्लोमा इन इंटिरियर डिझायनर मध्ये करिअर बनवा

केस गळतीमुळे त्रस्त आहात? आठवड्यातून दोनदा लावा 'हे' घरगुती तेल

मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

पुढील लेख
Show comments