Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतातील गणेश मंदिरे

वेबदुनिया
PTIPTI
गणेशोत्सव महाराष्ट्रात प्रामुख्याने साजरा होत असला तरी गणेशाची देशभरातही अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. त्या सर्वांची माहिती देणे अशक्य आहे. अनेक जैन, बौद्ध मंदिरात गणपतीची मूर्ती स्थापन केली आहे. त्यापैकी काही महत्त्वाच्या मंदिराची ही माहिती.

लुप्त गणपती क्षेत्रे
1. मंगळाने कठोर तपस्या करण्याच्या उद्देशाने नर्मदा किनारी एका ठिकाणी गणेशाची स्थापना केली होती. शास्त्रांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख 'पारीनेर' या नावाने केला आहे परंतु हे ठिकाण कोठे ते नेमके माहित नाही.
2. ' बल्लाळ विनायक' या नावाने एका क्षेत्राचा उल्लेख शास्त्रात आहे. हे क्षेत्र सिंधुदेशात कोठे तरी एका ठिकाणी आहे. परंतु संपूर्ण माहिती हाती नाही.
3. महर्षी कश्यपाने आपल्या आश्रमात वक्रतुंडाची प्रतिमा स्थापन करून तप केले होते. पण हा आश्रम कोणत्या ठिकाणी आहे त्याची माहिती उपलब्ध नाही.
4. तेलंगणातील अनल असुराचा वध करण्यासाठी गणपतीने अवतार घेतला होता. याचा उल्लेख जरी मिळत असला तरी त्या ठिकाणाची माहिती मिळत नाही.

दक्षिण भारतातील गणेश मंदिरे-
1. मदुराई जिल्ह्यातील तिरूप्परंकुम पर्वताच्या कुशी‍त भव्य गणेश मंदिर आहे. या ठिकाणी स्वामी कार्तिकेय यांचा विवाह झाला असल्याची दंतकथा आहे. अगदी जवळच 'शर श्रवण' नावाचा प्राचीन तलाव आहे.
2. बारा ज्योर्तिलिंग व चार धामांपैकी रामेश्वरम् द्वादश हे एक धाम असून येथे श्रीरामाने प्रथमत: गणपती आणि नंतर रामेश्वर लिंगाची पूजा केली होती.
3. तिरूच्चिरापल्ली येथील ‍तीन शिखरांमधील सर्वांत उंच शिखरावर गणपतीचे अति प्राचीन मंदिर असून हे मंदिर 'उचिपिल्लेयार' या नावाने प्रसिद्ध आहे.
4. पॉंडेचरीच्या समुद्रकिनारी परदेशी लोकांनी बनविलेले एक मंदिर आहे.
5. कन्याकुमारी: हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हे ज्या ठिकाणी एकत्र मिळतात तेथे गणपतीचे मंदिर आहे. या मंदिराचे दर्शन केल्यावरच कुमारिकादेवीचे दर्शन घेतले जाते.
6. गोकर्णात सिद्ध गणपतीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या डोक्यावर रावणाने आघात केल्याचे चिन्ह आहे.

चमत्कारीक मूर्ती: केरळ राज्यातील कासरा गौड रेल्वे स्टेशनपासून जवळ असलेल्या माधुरे गावात महागणपतीचे एक मंदिर आहे. येथे स्वयंभू गणपतीची प्रतिमा आहे. या मंदिराविषयी एक कथा आहे. एकदा एक दलित महिला गवत कापत असताना तिला जमिनीत एक मूर्ती दिसली. त्या मूर्तीच्या अंगावर घाव पडल्याने रक्त वाहत होते.

तिने ही बातमी गावकर्‍यांना सांगितली तेव्हा गावकर्‍यांनी लगेच त्या ठिकाणी एक मंदिर बनविले. नंतर त्या मूर्तीतून वाहणारे रक्त बंद झाले. अकराव्या शतकात हे मंदिर बनविले होते. त्यावेळी ही प्रतिमा 8 से.मी. x 4 से. मी एवढ्या उंचीची होती. आता ती 25 से.मी. x 10 से.मी एवढ्या मापाची झाली आहे. तिने जवळजवळ सर्व गाभारा झाकून टाकला आहे.

श्वेत विघ्नेश्वर क्षेत्र: अमृत मंथनाच्यावेळी देवांना अमृत मिळाले नाही. तेव्हा देवांनी भगवान विघ्नेश्वराची आराधना केली. त्याचा वर मिळाल्यावर देवांना अमरत्व मिळाले. दक्षिण भारतातील अति प्रसिद्ध तिर्थस्थान आहे. ते कावेरी किनारी आहे.

परदेशातील गणेश मंदिरे

उत्तर भारतातील गणेश मंदिरे
उज्जैनमध्ये प्रसिद्ध ज्योर्तिलिंग महाकालेश्वराचे मंदिर आहे. तसेच सहा प्राचीन विनायक मंदिरे आहेत. 1. प्रमोद विनायक 2. मोद विनायक 3. दुर्मख विनायक 4. सुमुख विनायक 5. अविघ्न विनायक 6. विघ्न विनायक. श्री लक्ष्मणाने स्थापन केलेले गणेश तीर्थही उज्जैनमध्ये आहे. अमरकंटकच्या महर्षी भृगुच्या आश्रमात सिद्धी विनायक गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे गणपतीला दोन भुजा आहेत.

जोधपूर: मुख्य शहराजवळील घटियाला गावात राजस्थानी शैलीचा स्तंभ आहे. या स्तभांच्या चारही बाजूने गणेशाची प्रतिमा आहे. हा स्तभ इ.स. 882 साली बांधलेला असल्याचे लिहिले आहे.

रणथंबोर: राजस्थानच्या सवाई माधोपूर जवळ असलेल्या पर्वत रांगेच्या मध्यभागी अतिप्राचीन गणेश मंदिर आहे. या मंदिरात स्थापित गणेशाला लग्नसमारंभाप्रसंगी आणि शुभ कार्यासाठी प्रथमत: निमंत्रण दिले जाते. दरवर्षी येथे हजारो लग्नपत्रिका प्राप्त होतात.

वृदांवन: येथे मोठ्या गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

वाराणसी: वाराणसीमध्ये गणपतीची अनेक मंदिरे आहेत. ढूंढीराज गणपतीचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. याशिवाय काशीतील 56 गणपती मंदिराचा उल्लेख पुराणात मिळतो.


महाराष्ट्रातील गणेश मंदिरे
WDWD
कदंबपुर: इंद्राने महर्षी गौतमाच्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी येथे चिंतामणी गणेशाची स्थापना करून त्यांची आराधना केली होती. हे ठिकाण यवतमाळ जिल्ह्याजवळ आहे.

भालचंद्र गणेश क्षेत्र: चंद्राने या ठिकाणी गणपतीची आराधना केली होती. हे ठिकाण परभणीपासून 50 किलोमीटर गोदावरी नदी किनारी आहे.

चिंतामणी गणेश क्षेत्र: ब्रम्हदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण करण्याचे कार्य सुरू केले तेव्हा त्यामध्ये अनेक विघ्न आले. हे विघ्न दूर करण्यासाठी ब्रम्हाने गणेशाची स्थापना करून त्याचे स्तवन केले. हे मंदिर पुण्यापासून 24 किलोमीटर 'थेऊर' येथे आहे.

मणिपूर क्षेत्र: त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी शंकराने महागणपतीची आराधना केली होती. हे ठिकाण पुण्यापासून 50 किलोमीटर आहे. या ठिकाणाला 'महोत्कट' गणेशाच्या नावाने ओळखले जाते.

अमलाश्रम क्षेत्र: यमराजाने आपल्या आईच्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी श्रीगणेशाची स्थापना करून कठोर तपस्या केली होती. ही मूर्ती 'आशापूरक-गणेश' या नावाने प्रसिद्ध आहे. हे ठिकाण जालन्यापासून 35 किलोमीटर आहे.

पुणे व परिसरातील गणेश मंदिरे
महाराष्ट्रातील पुण्यापासून 60 किलोमीटरवर मोरगाव येथे मयूरेश्व र
WDWD
गणपतीचे प्राचीन मंदिर आहे. तसेच शनिवार पेठेतील वरद गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. पुण्यापासून 20 किलोमीटर थेऊर येथे 'गिरीजात्मक' नावाने प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. तेथूनच जवळ असलेल्या ओझर गावात 'विघ्नेश्वराची' प्रतिमा आहे.

पुण्याजवळील रांजणगाव येथे वास्तुकलेचा अदभूत नमुना असलेले 'महागणपतीचे' मंदिर आहे. येथेच 'महोत्कट' गणपतीची मुर्ती आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्ये म्हणजे उत्तरायन व ‍दक्षिणायन या काळात सूर्य जेव्हा मध्यन्हस्थानी असतो तेव्हा सूर्य किरणे मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'महागणपतीच्या' प्रतिमेवर पडतात. चिंचवड येथे मंगलमूर्ती गणेश मंदिर आहे.

सारसबागेत सिद्धी विनायकाचे मंदिर आहे. पुण्यात दशभुजा चिंतामणीचे प्रसिद्ध मंदिर आहे. गणेश पुराणात उल्लेख असलेल्या मंदिर निर्मितीसंबंधी सर्व आवश्यक नियमांना लक्षात ठेवून त्याची निर्मिती केली आहे.

मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंदिरे:
मुंबईत प्रभादेवी येथे प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर आहे. सध्या त्याचा जिर्णोद्धार करून भव्य मंदिराच्या रूपात ते उभे आहे. दुसरे सिद्धी विनायक मंदिर मूळजी जेठा मार्केटमध्ये आहे. एकदा कापड मार्केटमध्ये भयानक आग लागली होती.

मंदिराच्या चारही बाजूने भयानक आग पसरली होती परंतु हे मंदिर आणि गणेश चौकात असलेली सर्व दुकाने सुरक्षित होते, असे सांगितले जाते. या मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली असते. याशिवाय मुंबादेवी व गिरगाव येथे ही प्राचीन गणेश मंदिरे आहेत. कळंबादेवी, बांद्रा, बाल केशर, भूलेश्वर इत्यादी अनेक ठिकाणी गणेश मंदिरे आहेत.

गणेशोत्सव विशेषसाठी येथे क्लिक करा...




आरती शुक्रवारची

Coconut Remedies: व्यवसायात नुकसान झाले असेल तर नारळाच्या उपायाने पैसे परत मिळवा

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

सरयू नदी का शापित आहे ? शिव का क्रोधित झाले होते जाणून घ्या

आरती गुरुवारची

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

Show comments