Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केदारेश्‍वर मंदीर (व्हिडिओ पाहा)

- भिका शर्मा

Webdunia
आयुष्‍यात एकदा तरी काशी यात्रेला जावे अशी इच्‍छा प्रत्‍येक हिंदुची असते. जीवंतपणी जर हे शक्‍य झाले नाही तर निदान मृत्‍युनंतर तरी आपल्‍या अस्‍थी काशीला नेऊन गंगेत विसर्जित व्‍हाव्‍यात असेच प्रत्‍येकालाच वाटते.

नंदुरबार जिल्‍ह्यातील शहादा या तालुक्‍याच्‍या गावापासून सुमारे 40 कि.मी. अंतरावर महाराष्‍ट्र आणि गुजरात राज्‍याच्‍या सीमेवर आहे, दक्षिण काशी 'प्रकाशा'. तापी, पुलंदा आणि गोमाई नदीच्‍या या संगमावर शिवशंकराची सुमारे 108 मंदीरे असल्‍याने या भागास प्रतिकाशी असेही म्‍हटले जाते.

WD
काशी यात्रे इतकेच महत्‍वाची समजली जाणा-या या तीर्थक्षेत्रावर केवळ महाराष्‍ट्रातूनच नव्‍हे देशभरातून दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. 'तापी महात्‍म्‍य' या प्राचीन धर्मग्रंथात या या भागाची महती सांगितली आहे. असे म्‍हणतात, की अनेक शतकांपूर्वी सहा-सहा महिन्‍याचा दिवस आणि रात्र असायचे. या काळात स्‍वतः शंभू महादेवाने एका सिध्‍द पुरुषाच्‍या स्‍वप्‍नात येऊन एकाच रात्रीत माझे 108 मंदिरे ज्‍या भागात बांधली जातील तेथे मी कायमस्‍वरूपी वास्‍तव्‍यास येऊन राहील. त्‍यावरून सुर्यकन्‍या तापी आणि पुलंदा व गोमाई नदीच्‍या संगमावरील हे नितांत सुंदर ठिकाण निवडण्‍यात आले. शिवभक्‍तांनी एकाच रात्रीतून या भागात 107 मं‍दिरे उभारली. मात्र 108 व्‍या मंदिराचे निर्माण कार्य सुरू असतानाच दिवस उजाडला. प्रकाश्‍ा पडला म्‍हणून या भागाला 'प्रकाशा' असे म्‍हटले जाते. त्‍यानंतर तीर्थक्षेत्र काशीमध्‍ये शिवशंकराच्‍या 108 मंदिरांची निर्मिती झाली आणि तेथे ते काशीविश्‍वेश्‍वराच्‍या रूपाने विराजमान झाले.

तापी नदीच्‍या किना-यावर असलेली ही मंदिरे संपूर्ण दगडी आणि हेमाडपंथी पध्‍दतीची आहे. एकाच मंदिरात काशीविश्‍वेश्‍वर आणि केदारेश्‍वराचे मंदीर आहे. काशीत नसलेले पुष्‍पदंतेश्‍वराचे मंदिरही इथे असून या मंदिरामुळे या भागाला विशेष महत्‍व आहे. काशी यात्रा करून आल्‍यानंतर या ठिकाणी येऊन उत्तर पूजा न केल्‍यास काशी यात्रेचे पूण्‍य मिळत नाही, असे म्‍हटले जाते.

WD
मंदिरांच्‍या गाभा-यात काळ्या पाषाणातून कोरून काढलेले भव्‍य शिवलिंग आणि नंदी आहेत. केदारेश्‍वर मंदिराच्‍या समोर दगडांचे बांधकाम असलेला भव्‍य दीपस्‍तंभ आहे. या ठिकाणी अंत्यसंस्‍कार आणि अस्थिविसर्जनासाठी या परिसरात तीर्थक्षेत्र काशीप्रमाणेच घाट आहेत. त्‍यामुळे येथून देशातील अनेक भागातून अस्थिविसर्जनासाठी लोक येत असतात. शंभर वेळा काशी यात्रा तर एक वेळा प्रकाशा यात्रा अशी भाविकांची श्रध्‍दा आहे.

कसे जाल-

रस्‍ता मार्ग ः
मध्‍यप्रदेश, गुजरात आणि महाराष्‍ट्राच्‍या सीमेवर असलेले प्रकाशा हे ठिकाण शहादा जि. नंदुरबार येथून 40 कि.मी. अंतरावर असून अंकलेश्‍वर - ब-हाणपूर या राज्‍य महामार्गावर आहे. नाशिक, मुंबई, पुणे, सुरत आणि इंदूर येथून नंदुरबार किंवा शहादा येथे जाण्‍यासाठी बससेवा उपलब्‍ध आहेत.

रेल्‍वे मार्गः
जवळचे रेल्‍वे स्‍टेशन नंदुरबार असून ते सुरत-भुसावळ रेल्‍वे मार्गावर आहे. तेथून शहादा येथे येत असताना रस्‍त्‍यातच प्रकाशा हे गाव आहे.
सर्व पहा

नवीन

अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi

Ashadhi Ekadashi 2024 आषाढी एकादशी 2024 कधी आहे? जाणून घ्या तिथी मुहूर्त आणि महत्तव

Devshayani Ekadashi आषाढी एकादशीला चुकुन करुन नये ही 4 कामे

टिटवाळा येथील महागणपती

अंगारकी संकष्टी चतुर्थी 2024 संपूर्ण माहिती Angarki Sankashti Chaturthi 2024

सर्व पहा

नक्की वाचा

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

आंदोलकांनी केनियाच्या संसदेला आग लावली,भारताने आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी, मोदी-राहुल गांधींनी सोबत जाऊन केलं अभिनंदन

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

Show comments