Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

Webdunia
PTIPTI
इंग्लंड एशेस मालिका विजयाच्या सोहळ्यात दंग असतानाचा रिकी पॉटींगने भविष्यातील आडाखे आखत क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वास ओहोटी लागू देणार नाही, हे मनाशी पक्के केले होते. कांगारूंचे पुनरागमनातील आक्रमण त्यांच्या शैलीस शोभणारेच होते. दोन हजार सहाच्या शेवटी चँमियन्स करंडकावर मोहोर उमटवल्यावर त्यांनी एशेश मालिकेत इंग्लंडचा 5-0 ने फडशा पाडला. सलग दुसर्‍या विश्वकरंडकात विश्वविजेतेपद पटकावून विजयाचा अश्वमेध कायम ठेवला.

भार‍ताविरूद्ध सव्वीस जानेवारीपासून सुरूवात होणार्‍या कसोटी मालिकेअगोदर त्यांनी सलग चौदा कसोटी विजयांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. सलग सोळा कसोटी विजयाच्या विक्रमापासून ते अवघे दोन सामने दूर आहेत. वर्षाच्या सुरूवातीसच त्यांनी आपल्या व्यावसायिकतेचे दर्शन घडवले. त्यांच्या डोळे दिपवणार्‍या विजयी मोहिमेस फक्त इंग्लंड व न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत वेसण घातली. मात्र वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वकरंडकात हिशोब चुकता केला. सिडनीतील शेवटचा कसोटी सामना आनंद सोहळा साजरा करण्यासोबतच शेन वॉन, ग्लेन मॅकग्राथ व जस्टीन लँगर यांना निरोप देण्यामुळेही कायमचा स्मृतीत राहीला. निवृत्तीच्या वेळी वॉर्नच्या नावावर कसोटीत 708 बळींचा विक्रम होता.

मॅकग्राथने विश्वचषकात चमकदार कामगिरी करून मालिकावीराचा बहूमान पटकावला. त्याने कसोटीत 563 बळी नोंदवून कोणत्याही वेगवान गोलंदाजाने केलेली सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. वर्षाच्या शेवटी श्रीलंकेच्या मुरलीधरनने कसोटीतील सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावे केला. तो एक हजार बळींचा टप्पा पूर्ण करो अथवा नाही. पण त्याचा हाच विक्रम तोडणे अशक्यप्राय आहे.

पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांच्या मृत्यूने विश्वकरंडकाच्या उत्साही वातावाणावर काळे ढग जमले. ऑयर्लंडविरूद्ध पाकच्या पराभवानंतर अठरा मार्चला किंग्सटन येथे एका हॉटेलमध्ये ते मृतावस्थेत आढळले होते. सुरूवातीस विष दिल्यानंतर गळा दाबल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यामध्ये सट्टेबाजांचा हात असू शकतो, अशा संशयासही वाव होता. जमैका पोलिसांनी यास खूनाचे प्रकरण मानून चौकशीस सुरूवात केली होती. मात्र मधुमेह, उच्च रक्तदाबासहित कित्येक आजारांनी त्यांच्यावर आक्रमण केले होते.

अखेर गेल्या महिन्यात कॉरोनरच्या चौकशीनंतरही त्यांचा मृत्यू नैसर्गिक की त्यांचा खून करण्यात आला, हे स्पष्ट झाले नाही. विश्वकरंडकात भारत व पाकिस्तान पहिल्या फेरीतच बाहेर गेल्याने आशिया खंडातील क्रिकेट चाहत्यांसोबतच व्यवसायासही फटका बसला. तिकिटांचे गगनाला भिडणारे दर व मैदानात वाद्य नेण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने उरला सुरला उत्साहही मावळला. विश्वकरंडकास स्थानिक प्रेक्षकांचाही उत्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही.

या विश्वकरंडकातील संस्मरणीय घटना म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने हॉलंडविरूद्ध एका षटकात सहा षटकार ठोकले. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसित मलिंगाने सलग चार चेडूंवर चार बळी घेऊन हंगामा केला.

दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला ट्वेंटी-20 विश्वकरंडक रोमहर्षक झाला. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत विश्वकरंडकावर नाव कोरले. युवराजसिंहने इंग्लडविरूद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉड यांस एका षटकात सहा षटकार ठोकून भारतीय विजय अभियानास भरजरी वस्त्र बहाल केले.

वॉर्न, मॅकग्राथ व मुरलीधरनच्या वैयक्तिक कामगिरीव्यतिरिक्तही दोन हजार सात फलंदाजांचेच वर्ष राहीले. जॅक कॅलिसने सात डावात पाच शतके ठोकली व दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान, न्यूझीलंड व भारताविरूद्ध मालिका जिंकल्या. श्रीलंकेच्या कुमार संगकाराने बांगलादेशच्या कमकुवत गोलंदाजीचा समाचार घेत दोन द्विशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध 192, इंग्लंडविरूद्ध 152 धावा काढण्यासोबतच चार कसोटीत सलग 150 पेक्षा अधिक धावा काढणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.

ऑस्ट्रेलियाचा एडम गिलख्रिस्ट कसोटी सामन्यात 100 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज झाला आहे. सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या एलन बॉर्डरला मागे टाकत ब्रायन लारानंतर कसोटीत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा दुसरा फलंदाज झाला आहे. सहकारी खेळाडू व अधिकार्‍यांसोबत वाद झाल्यानंतर विश्वकरंडक आटोपल्यावर लाराने निवृत्तीचा निर्णय जाहिर करून तमाम क्रिकेट रसिकांना धक्का दिला.
सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

लक्ष्मीपूजन विशेष नैवेद्य : सोप्पी रेसिपी पेढा

दिवाळीत अशा प्रकारे चेहऱ्याची चमक वाढवा,या कॉन्टूरिंग मेकअप टिप्स अवलंबवा

Firecrackers Burning Remedies : फटाक्याने हात भाजल्यास हे उपाय करा

Career in MBA Family Business Management : एमबीए फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट मध्ये करिअर

पपईच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Show comments