Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धकधक गर्लचे पुनरागमन

वेबदुनिया
शनिवार, 22 डिसेंबर 2007 (16:51 IST)
IFMIFM
२००७ या वर्षातील चित्रपटसृष्टीत घडलेल्या मोठ्या घटनांपैकी एक म्हणजे आपल्या मोहक हास्याने लाखो प्रेक्षकांना वेड लावणारी, लाखोंच्या ह्रदयाची धडकन माधुरी दीक्ष‍ितने केलेले पुनरागमन. यशराज फिल्म्सच्या 'आजा नच ले' या चित्रपटातून माधुरीने पुनरागमन केले. चित्रपटाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. पण माधुरीच्या अभिनयाची मात्र वाहवा झाली. त्याच जुन्या अंदाजात माधुरी पुन्हा दिसली. या धकधक गर्लशी त्यावेळी मारलेल्या गप्पांचा हा गोषवारा........

पुनरागमनाविषयी......
हो. बराच कालावधी गेल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नसते. कारण तुम्हाला तुमच्या पूर्वलौकीकाला जागून चांगलीच कामगिरी करावी लागते. तुमच्या प्रत्येक गोष्टींवर नजर ठेवली जाते. सगळ्यांना तुम्ही कोणता चित्रपट करत आहात व त्यात कोणती भूमिका करत आहात याची उत्सुकता असते. लोकांच्या खूप अपेक्षा असतात. त्याचा ताणही असतो. मी चुकीचे तर करत नाही ना? माझे काम आवडेल ना? असे अनेक प्रश्न मनात थैमान घालत असतात. माझ्यावर दोन मुलांची जबाबदारी आहे. ते मुंबईत राहू शकतील ना ? असा विचार माझ्या मनात होता. कारण इतके दिवस त्यांनी कधीच मुंबईत घालवले नाहीत. पण त्यांनी शूटींगचा मनसोक्त आनंद घेतला. माझा मोठा मुलगा आता हिंदी बोलतोही व हिंदी गाणेही गातो.

चोप्रा कुटुंबियांशी संबं ध
फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्यात नृत्य केल्यानंतर यशजींनी मला चित्रपटात काम करण्यासंदर्भात विचारणा केली. मी यावर गांभीर्याने विचार केला नव्हता. नंतर आदित्य चोप्राने माझ्याशी चर्चा केली व चित्रपटाचा विषय मांडला. यशजींसोबत मी 'दिल तो पागल है' हा चित्रपट केला होता. त्यांचे काम सुनियोजीत व व्यवस्थित असते. त्याचप्रमाणे ते जे सांगतात ते खरे करून दाखवितात. त्यामुळे मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. त्या आदरापोटीच मी त्यांना होकार दिला.

  बराच कालावधी गेल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नसते. तुम्हाला तुमच्या पूर्वलौकीकाला जागून चांगलीच कामगिरी करावी लागते. तुमच्या प्रत्येक गोष्टींवर नजर ठेवली जाते. सगळ्यांना तुम्ही कोणता चित्रपट करत आहात व त्यात कोणती भूमिका करत आहात याची उत्सुकता असते.      
' आजा नच ले'बद्द ल
पाश्चात्य संस्कृती आपल्या देशात पाय पसरवत आहे. परिणामी प्राचीन परंपरा असल्या आपल्या संस्कृतीपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपली कला, कौशल्ये नष्ट होत आहेत. चित्रपट माध्यम हेही त्यातलेच एक. हा चित्रपट आपल्या संस्कृतीशी नाळ जोडतो. आपली मुल्ये व संस्कृती याकडे घेऊन जातो. ही कथा आजच्या युगाशी मिळतीजुळती आहे. थोडक्यात 'फिल गुड मूव्ही' आहे.

दीर्घकाळानंतर कॅमेरासमोर....
फारच छान. पहिले दोन तास मी काही विसरले तर नाही ना? अशी भीती मनात होती. पण दोन तासांनी हेच विसरली की मी सहा वर्षांनी शूटींग करत आहे.

चित्रपट जगतातील बदल....
हो, बरेच बदल पहायला मिळाले. आता वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनविले जात आहेत. सगळी कामे सुव्यस्थित होत आहेत. पटकथा आधीच दिली जाते. मला आठवते की आधी मी जेव्हा शूटींगला जायची तेव्हा बर्‍याचदा मला काय करायचे आहे हेच माहीत नसायचे. सेटवरच संवाद लिहिले जायचे. पण आता असे होत नाही. त्यामुळे कलाकारांना खूप मदत होते. ते तयारी करूनच सेटवर येतात. आता सिंक साउंडमध्ये शूटींग केले जाते. त्यामुळे डबिंगचे टेन्शन रहात नाही. आता 'भेजा फ्राय' व खोसला का घोसला' सारखे चित्रपट यशस्वी होतात. हे वेगळेपण या काळात घडले.

' आजा नच ले' नंतर पुढे...
मी याबाबत अजून विचार केलेला नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खा, आरोग्यासाठी फायदे मिळतील

ऑफिसमध्ये चांगली इमेज बनवायची असेल तर चुकूनही या चुका करू नका

पौराणिक कथा : श्री कृष्ण आणि कालिया नागाची गोष्ट

बाजरीची इडली रेसिपी

आवळ्याच्या पाण्याची वाफ घ्या,सर्दी आणि घसादुखीपासून त्वरित आराम मिळवा

Show comments