Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रस्थापित अभिनेत्रींच्या पिछेहाटीचे वर्ष

Webdunia
सरते वर्ष प्रस्थापित अभिनेत्रींसाठी प्रतिकूल राहिले. राणी, प्रीती झिंटा, ऐश्वर्या रॉय यासारख्या प्रस्थापित अभिनेत्रींना मागे टाकत विद्या बालन, कैतरिना कैफ, दीपिका पदुकोण व लारा दत्ता सारख्या नवोदित अभिनेत्रींनी हिट चित्रपट दिले. अभिनेत्रीच्या कामगिरीचा धावता आढावा घेऊया -

कैतरिना कैफ (नमस्ते लंडन, पार्टनर, अपने, वेलकम)
IFMIFM
कैतरिनाच्या चित्रपट कारकीर्दीचा आढावा घेतल्यास एखादा अपवाद सोडल्यास बहुतेक सर्व चित्रपट हिट झाले आहेत. पदार्पणाअगोदर सलमान खानची प्रेयसी म्हणून ओळख असलेल्या कैतरिनाने बघता बघता स्वत:ची ओळख निर्माण केली. आता ती स्वत:चे निर्णय स्वतः घेते. निर्मातेही कैतरीनाचे महत्त्व ओळखून आहेत. कैतरिनानेही हिंदी संवादफेक व अभिनयात चांगलीच सुधारणा घडवून आणली आहे. ख्रिसमसच्या शुभमुहूर्तावर येणार ा 'वेलकम' यशस्वी झाल्यास तिच्या याव र्षातील निर्विवाद यशावर शिक्कामोर्तब होईल.

विद्या बालन (सलाम-ए-इश्क, गुरु, एकलव्य, हे बेबी, भूलभुलैया)
IFMIFM
सलग तीन हिट चित्रपटातून झळकून विद्याने भक्कम पायाभरणी केली आहे. ' हे बेबी' मधून मॉडर्न लूक धारण करून तिने ग्लॅमरस बनण्याचा प्रयत्नही केला. विद्याची अभिनयाची बाजू भक्कम असल्यामुळे तिला प्रियदर्शन, विधू विनोद चोप्रा, निखिल अडवाणी, मणिरत्नम यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधून ‍अिभनयाची संधी मिळाली. नवीन वर्षात तिचे चांगले चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दीपिका पदुकोण (ओम शांती ओम)
IFMIFM
दीपिकाने पदार्पणातच अनेक प्रस्थापित अभिनेत्रींची झोप उडवली. तिचा एकच चित्रपट आला असला तरी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व स्टार अभिनेते व दिग्दर्शक दीपिकासोबत काम करण्यास इच्छुक आहेत. तरूण वर्गात प्रसिद्ध असलेली दीपिका पहिल्या क्रमांकाची प्रबळ दावेदार आहे.

राणी मुखजीँ (ता रा रम पम, लागा चुनरी में दाग, सांवरिया)
IFMIFM
अभिनयातली राणी म्हणून प्रसिद्ध असलेली राणी निवडक चित्रपटांमधूनच दिसत आहे. मात्र, यावर्षी तिला अपेक्षित यश मिळाले नाही. लागा चुनरी मे दाग पूर्णपणे तिचा चित्रपट होता. पण तिकीट खिडकीवर तो प्रभाव पाडू शकला नाही. सांवरिया व 'ता रा रम पम' सारख्या चित्रपटांमधून तिने दमदार अभिनय केला मात्र चित्रपट कमकुवत असल्याचा फटका राणीस बसला. बहुतेक राणी आता लग्नाच्या तयारीत आहे.

प्रीती झिंटा (झूम बराबर झूम)
प्रीतीचेही सध्या अभिनयापेक्षा नेस वाडियाकडे अधिक लक्ष आहे. यावर्षात ती फक्त एका चित्रपटातून झळकली. तोही फलॉप झाला. राणीप्रमाणेच प्रीतीही लग्नाची गाठ बांधण्याच्या तयारीत आहे.

ऐश्वर्या रॉय (गुरु, प्रोव्होक्ड)
IFMIFM
यावर्षात ऐश्वर्या चित्रपटांपेक्षा लग्न, करवा चौथ व धार्मिक स्थळांच्या भेटींमुळे अधिक चर्चेत राहीली. ती गर्भवती असण्याबाबतही अंदाज बांधण्यात आले. बॉलीवूडमधील बहुतांश आघाडीच्या कलाकारांशी तिचे पटत नाही. चित्रपटांपेक्षा तिच्यासाठी कुटुंब अधिक महत्त्वाचे आहे. यावर्षी 'गुरू' चित्रपटामुळे तिला यश मिळाले तर प्रोव्होक्ड' मुळे तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली.

लारा दत्ता (झूम बराबर झूम, पार्टनर)
IFMIFM
' झूम बराबर झूम' सारख्या पडेल चित्रपटापासून एकाच व्यक्तीला फायदा झाला. ती म्हणजे लारा दत्ता. डेव्डिड धवन यांच्या ' पार्टनर' चित्रपटामुळे तिचा हिट चित्रपटांचा दुष्काळही संपला आहे. आपणं विनोदी भूमिकाही भक्कमपणे करू शकतो, हे पार्टनरने सिद्ध केले.

शिल्पा शेट्टी (मेट्रो, अपने)
IFMIFM
शिल्पा शेट्टीसाठी हे वर्ष भरभराटीचे गेले. 'बिग ब्रदर' स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. चित्रपटांपेक्षा तिचा संगीतमय कार्यक्रम 'मिस बॉलीवूड' ने यशाचे विक्रम नोंदवले. 'मेट्रो' मधील अभिनयासाठी ती कौतुकास पात्र ठरली. देवलबंधूंच्या 'अपने' मधूनही ती झळकली.

करीना कपूर (जब वी मेट)
PRPR
करीनाने शाहिदचा हात सोडून सैफचा हात धरला. पण ती चित्रपटांपेक्षा चर्चेत राहीली ती प्रेमप्रकरणामुळे. त्यातच 'जब वुई मेट' चित्रपटही यशस्वी ठरला. सैफच्या प्रेमात पडलेल्या करीनाकडे चांगले चित्रपट असून ते नवीन वर्षात प्रदर्शित होतील.

प्रियांका चोप्रा (सलाम-ए-इश्क, बिग ब्रदर)
IFMIFM
प्रियांकाने फार पूर्वी साइन केलेला 'बिग ब्रदर' नवीन वर्षात झळकेल. ‍या वर्षीचे तिचे दोन्ही चित्रपट तिकीट खिडकीवर आपटले तरी प्रियांकाची दखल घेणे आवश्यक आहे. वयासोबतच दिग्दर्शकांचा विश्वास तिच्याबरोबर आहे. आगामी काळात तिचे आणखी चित्रपट येतील. हरमनच्या नावाचा जप केल्यापेक्षा तिला अभिनयावर अधिक लक्ष द्यावे लागेल.

बिपाशा बासू (नहले पे देहला, गोल)
IFMIFM
बॉयफ्रेंड जॉन अब्राहमप्रमाणेच बिपाशालाही यावर्षात यशाने झुकांडी दिली. कारकिर्दीच्या खडतर प्रवासातून ती जात आहे. भविष्यात आशा ठेवता येईल असे दर्जेदार चित्रपटही तिच्याकडे नाही. जॉन व तिच्यात ब्रेकअप झाला आणि पुन्हा ते एकत्रही आले. बहुतेक जॉन-विद्याच्या बातम्या कानावर पडत असल्यानेच तिने सैफशी मैत्री वाढवली होती. परिणामी जॉन बिपाशाकडे परत आला.

सुश्मिता सेन (रामगोपाल वर्मा की आग)
IFMIFM
मुक्त जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुश्मिता सेनला हिंदी चित्रपटसृष्टीत अद्यापपर्यंत कुणीही गांभीर्याने घेतले नाही आणि तिनेही चित्रपटांना गांभीर्याने घेतेले नाही. त्यामुळे तिच्या कारकिर्दीची गाडी रडतखडत चालली आहे. रामगोपाल वर्मा की आग हा तिचा प्रदर्शित झालेला वर्षातील एकमेव चित्रपट. सध्या ती 'दुल्हा मिल गया' नावाचा चित्रपट करत असून तिने लवकरच लग्नाच्या मागे लागले पाहिजे.

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

गुंतलेले आणि फ्रिज़ी केसांना मऊ करण्यासाठी हे 3 हेअर मास्क वापरा

हे 3 जपानी रहस्य तुम्हाला लठ्ठपणापासून नेहमी दूर ठेवतील

ऑफिसच्या खुर्चीवर बसून करा ही 3 योगासने, लठ्ठपणा लगेच कमी होईल

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

प्रॉन्स फ्राय: मसालेदार कोळंबी रेसिपी

Show comments