यंदाचं २००७ हे वर्ष भारताच्या बाबतीत महिला विशेष वर्ष ठरले आहे. स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवी वर्षात भारताची धुरा प्रथमच एका महिलेच्या हाती आली. अर्थात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण याही वर्षी लागू होऊ शकले नाही. पण इतर बाबतीत महिलांचा वरचष्मा राहीला.
महाराष्ट्राची कन्या असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी २५ जुलै २००७ ला राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली आणि इतिहास घडविला. राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. जळगाव जिल्ह्यातून करीयरची सुरवात करणाऱ्या प्रतिभाताईंनी राजकारणात विविध सन्मानाची पदे भूषवली. राजस्थानच्या राज्यपालपदीही त्या होत्या. त्यानंतर त्यांना हे मानाचे पद मिळाले. उपराष्ट्रपती असलेले भैरोसिंह शेखावत हेही या स्पर्धेत होते, मात्र प्रतिभाताईंनी त्यांना तीन लाखा मतांनी शिकस्त दिली.
PTI
PTI
सोनियांचा प्रभाव- इच्छा नसतानाही राजकारणात आलेल्या सोनियांनी राजकारण फार लवकर समजून घेतले आणि त्याचा उपयोगही केला. उगाच नाही, टाईम या विख्यात नियतकालिकात २००७ मधील जगातील १०० प्रभावशाली महिलांमध्ये सोनियांचा समावेश केला. तेही या शंभर महिलांमध्ये सहावे स्थान. यावरून सोनियांचे महत्त्व जागतिक पातळीवर लक्षात यावे. पण त्यांनी पाठपुरावा करूनही महिला आरक्षणासाठी त्या इतर पक्षांची विशेषतः घटक पक्षांची मते अनुकूल करून घेऊ शकल्या नाहीत. पण वर्षभरात सोनियांचा प्रभाव सरकारवर आणि अर्थातच पक्षावपही राहिला.
अणू करारापासून इतर मुद्यांवरून डाव्या पक्षांना चुचकारत तर कधी ललकारत त्यांनी हे वर्ष गाजवले. शेवटच्या काळात तर गुजरातमध्ये त्यांनी जोरदार प्रचार केला. नरेंद्र मोदींना थेट आव्हान देताना त्यांच्या शेलक्या शब्दांनी मोदींसारख्या कसलेल्या राजकारण्यालाही त्यांनी जेरीस आणले.
PTI
PTI
सानियाची झेप- महिला आरक्षणासाठी वितंडवाद चालू असताना विविध क्षेत्रात महिला कर्तृत्वाची नवी शिखरेही गाठत आहेत. टेनिस क्षेत्रात जिथे भारतीयांचे नाव आढळत नव्हते, तिथे सानियाने आता स्वतःच्या कर्तृत्वाचे झेंडे गाडले आहेत. अल्पावधीतच सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या या हैदराबादी बालेने या वर्षात अनेक नविन पराक्रम केले. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत मानांकन मिळविणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू बनली. अमेरिकन ओपन स्पर्धेत सानियाला हे मानांकन मिळाले होते. या स्पर्धेत ती तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचली होती. यशाच्या एकेक पायऱ्या वर चढत चाललेली सानिया सामाजिक जाणीवही राखून आहे. म्हणूनच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मुली वाचवा या मोहिमेची ती ब्रॅंड अँबेसेडर आहे.
उद्योगजगतातील महिलाराज-
ND
ND
उद्योगजगतातही महिलांनी यंदाच्या वर्षी आपला ठसा उमटवला. बायोकॉन कंपनीला एंझाईम कंपनीतून जागतिक पातळीवरील कंपनी बनविण्याचे श्रेय किरण मुजुमदार यांना जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारतीय महिला चमकल्या. पेप्सिकोच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्य ा इंद्रा नुयी यांची निवड हे त्याचे उत्तम उदाहरण. फोर्ब्स या नियतकालिकेने २००७ मधील प्रभावशाली महिलांमध्ये पाचवे स्थान इंद्रा नुयी यांना दिले आहे.
IFM
IFM
बॉलीवूडमध्ये महिलांचा दबदबा- चित्रपच उद्योगातही महिलांनी दबदबा राखला. या वर्षीचा सुपरहिट चित्रपट फरहा खानच्य ा नावे जातो. ओम शांती ओमच्या निमित्ताने महिला दिग्दर्शकही सुपरहिट चित्रपट देऊ शकतात, हे दाखवून दिले. ऐश्वर्या रॉयही या वर्षी चर्चेत राहिली. हॉलीवूडमध्ये तिचे चित्रपट प्रदर्शित झाले. द लास्ट लेजिन हा चित्रपट रशिया व नेदरलॅंडमध्ये प्रदर्शित झाला, तर सर्किल ऑफ लाईट लाईट यावर आधारीत प्रोव्होक्ड भारत व ब्रिटनमध्ये प्रदर्शित झाला.
अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांच्या मते, महिलांवर आधारीत अनेक चित्रपट होत आहेत. त्यातून काही साध्यही करता येत आहे. त्यांच्यासाठी अनेक योजनाही येत आहेत. पण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. त्यासाठी बरेच काही करावे लागणार आहे.
ND
ND
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या निर्मला देशपांडे म्हणतात, की केवळ गप्पा मारून काही होणारन नाही. त्यासाठी ठोस काहीतरी करावे लागेल. तरच महिलांच्या अवस्थेत सुधारणा होईल. मुले व मुली सारख्या असे म्हणत असताना दुसरीकडे स्त्री भ्रुण हत्या होते, आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महिलांच्या दृष्टीकोनातून या वर्षी बरेच काही घडले, पण बरेच काही बाकीसुद्धा आहे, हेही तितकेच खरे.