Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंडियन मुजाहिदीन संघटना प्रकाशात

Webdunia
WDWD
जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद पाठोपाठ दिल्‍लीलाही हादरवून सोडणारी 'इंडियन मुजाहिदीन' ही दहशतवादी संघटना 'आयएसआय'च्‍या हातचे बाहूले असून भारतात धर्मिक विद्वेश पसरविण्‍याचे काम करण्‍यासोबतच येथील तरुणांची माथी भडकावून देशाविरुध्‍द युध्‍द पुकारण्‍यास प्रवृत्‍त केले जाते. 2008 मध्ये या संघटनेने देशातील विविध भागात केलेल्या स्फोटांनंतर ही संघटना प्रकाशात आली. यापूर्वी सिमी या नावाने काम करणार्‍या संघटनेने पोलिसांपासून आपली ओळख लपवण्यासाठी नविन नाव धारण करत देशात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या संघटनेची ही माहिती

इंडियन मुजाहिदीन कोण?- भारतात धर्मिक विद्वेश पसरवून देशाच्‍या एकतेला आणि अखंडतेला धोका पोचविण्‍याच्‍या उद्देशाने 'सिमी'ची
( स्‍टुडंट्स इस्‍लामिक मुव्‍हमेंट ऑफ इंडिया) स्‍थापना करण्‍यात आली आहे. या दहशतवादी कारवाया करणा-या संघटनेवर बंदी आणण्‍याचा निर्णय केंद्राने घेतल्‍यानंतर देशभर या संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांना अटक करण्‍यात आली. त्‍यामुळे भारतात सिमीच्‍या कारवायांवर बंधने आली. यातून पळवाट करण्‍यासाठी सिमीने आपल्‍या नावात बदल करून 'इंडियन मुजाहिदीन' हे नाव धारण केले आहे. याशिवाय सिमीचे आणखीही अनेक संघटनांशी संबंध आहेत.

आर्थिक मदत कुठून?- भारतात दहशतवादी कारवाया पसरविण्‍यासाठी भारतातीलच काही मुस्लिम तरुणांना भडकावून 'जिहाद'च्‍या नावाखाली त्‍यांच्‍याकडून देशविघातक कृत्‍य करवून घेत असल्‍याचा या संघटनेवर आरोप आहे. या संघटनेला दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्‍तानच्‍या 'आयएसआय' या गुप्‍तचर संस्‍थेकडून आर्थिक मदत केली जात असल्‍याचे अनेक पुरावे केंद्र सरकारकडे आहेत.

' मुजाहिदीन' म्‍हणजे काय?- मूळचा ऊर्दु शब्‍द असलेल्‍या मुजाहिदीनचा अर्थ 'लढवय्या' असा होतो. एका ठराविक उदेशाने धार्मिक युध्‍द छेडण्‍याची परवानगी इस्‍लाममध्‍ये देण्‍यात आली आहे. त्‍यास 'जिहाद' असे म्‍हटले जाते. त्‍याचा आधार घेऊन दहशतवादी कारवायांसाठी 'जिहाद'च्‍या नावाखाली मुस्लिम तरुणांची दिशाभूल करण्‍याचे काम ही संघटना करते आहे. या जिहादमध्‍ये सहभागी होणा-यांना मुजाहिदीन असे म्‍हटले जाते. एकदा जिहाद पुकारल्‍यानंतर तो संपविण्‍याचा अधिकार कोणालाही नसतो. त्‍याचे स्‍वरूप किंवा उद्देश मात्र बदलता येते. जिहादला विरोध करणारे सर्व जण जिहादच्‍या मान्‍यतेनुसार शत्रू समजले जाते.

आजवर संघटनेने केलेल्‍या कारवाया- सिमी आणि लष्‍कर-ए-तोयबा या संघटनांशी संबंधित असल्‍याने इंडियन मुजाहिदीन या संघटनेवर भारतात बंदी असून या संघटनेच्‍या सभासदत्‍वास बंदी करण्‍यात आली आहे. इंडियन मुजाहिदीन किंवा मिलिटंट इस्‍लामिक गृप ऑफ इंडिया या सिमीशी संबंधित संघटनांनी भारतात आजवर अनेक दहशतवादी कारवाया पूर्ण केल्‍या आहेत.

23 नोव्‍हेंबर 2007 या दिवशी उत्‍तर प्रदेशात, 13 मे 2008 जयपूरमध्‍ये बॉम्‍बस्‍फोट करण्‍यासोबतच 2008 या एकाच वर्षात या संघटनेने बंगरूळ, अहमदाबाद आणि 13 सप्‍टेंबर रोजी दिल्‍लीतील पाच भागांत बॉम्‍बस्‍फोट घडवून आणले आहेत. याशिवाय सूरतसह अनेक ठिकाणी बॉम्‍ब पेरल्‍याचाही या संघटनेवर आरोप आहे.

दहशतवादी कारवाई पूर्ण केल्‍यानंतर भारतातील प्रसिध्‍दी माध्‍यमांना ई-मेलने माहिती देऊन हल्‍ल्‍याची जबाबदारी स्‍वीकारण्‍याची या संघटनेची पध्‍दत आहे. जयपूरमध्‍ये बॉम्‍बस्‍फोट केल्‍यानंतर दोनच दिवसांनी या संघटनेने ई-मेलव्‍दारे देशात आणखी धमाके करण्‍याची धमकी दिली होती. अहमदाबादमध्‍ये केलेल्‍या स्‍फोटात सर्वाधिक 56 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या स्‍फोटानंतर आणि दिल्‍लीत झालेल्‍या स्‍फोटानंतर पाठविण्‍यात आलेले ई-मेल हे मुंबईतूनच पाठविण्‍यात आले होते. दिल्‍ली स्‍फोटांनंतर केलेल्‍या ई-मेलमध्‍ये संघटनेने दिल्‍लीनंतर आता आपण मुंबईवर हल्‍ला करणार असल्‍याची स्‍पष्‍ट धमकी दिली आहे.

या संघटनेने आजवर केलेले सर्व हल्‍ले गर्दीच्‍या ठिकाणी झालेले आहेत. तर सायकलींमध्‍ये, कच-याच्‍या ढिगा-यात प्‍लास्‍टीकच्‍या पिशव्‍यांमध्‍ये बॉम्‍ब ठेवले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

भिजवलेले बदाम की सुके बदाम, आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर?

थंडीमुळे पाय अखडत असतील तर या योगासनांचा सराव करा

बायकोची मनापासून माफी मागायची? मग पाठवा स्पेशल Sorry Messages In Marathi

चिकन तवा फ्राय रेसिपी

अचानक कोणी प्रपोज केले तर नकार कसा द्यायचा ?

Show comments