Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगभरातील अर्थव्यवस्थांसाठी 'काळे वर्ष'

नितिन फलटणकर
मंगळवार, 22 डिसेंबर 2009 (16:53 IST)
WD
WD
2009 या वर्षात मंदीच्या प्रवाहात भारतीय अर्थव्यवस्थाही होरपळली. इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत दिसून आल्याने भारता प्रती अमेरिका आणि युरोपीय देशांच्या दृष्टिकोनात या वर्षात महत्त्वपूर्ण बदल दिसून आले.

भारत आर्थिक महासत्ता बनत आहे, हे या वर्षात सिद्ध झाले आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे अमेरिके सारख्या स्वार्थी आर्थिक महासत्तेनेही भारताला वगळून कोणताही निर्णय घेणे अशक्य असल्याचे मान्य केले.

अमेरिकेतील मेरील लिंच आणि लेहमन ब्रदर्स या दोन बँकांना आपल्या दिवाळखोरीची जाणीव 2008 या वर्षातच झाली होती. परंतु या बँकांनी परिस्थिती पाहत आपली आर्थिक स्थीती दडपण्याचा प्रयत्न केला, आणि अमेरिकेवर आर्थिक संकट कोसळले. 1930 नंतर किंवा या पेक्षाही भयावह मंदीचा सामना अमेरिकेला या वर्षात करावा लागला आहे.

अमेरिका महासत्ता असल्याने बहुतांश देश आणि भारतही अमेरिकी बाजारावर अवलंबून आहे. याचा फटका या वर्षात या सर्वच देशांना जाणवला. इतर देशांच्या तुलनेत भारताचे मंदीमुळे कमी नुकसान झाले असले तरी, कंपन्यांच्या मानगुटावर बसलेल्या मंदीच्या भुताने या वर्षात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.
WD
WD


कमी पगारात काम करण्याची पाळी अनेकांना आली, तर हातची नोकरी वाचवण्यासाठी अनेकांनी तडजोड केली. केंद्र सरकारने देशातील उद्योगांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच आधार मिळाला. एकीकडे अमेरिकी बँका बुडत असतानाच भारतीय बँकिंग क्षेत्रही हादरले होते.

आयसीआयसीआय बँकेविषयी एका शेअर ब्रोकरने पाठवलेल्या एसएमएसने चांगलाच गोंधळ माजला होता. बँकेने वेळीच आपल्या परिस्थितीचा खुलासा करत बँकेला अमेरिकी फटक्याचा कोणताही तोटा झाला नसल्याचे जाहीर केले आणि भारतीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

अमेरिकेतील बँका एका पाठोपाठ बुडत असल्याने भारतीय बँकांकडे अर्थतज्ज्ञांचे लक्ष लागले होते. या काळात भारतीय बँकांनी संयम तर दाखवलाच शिवाय उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याने मंदीचा दगाफटका भारतीय बँकांना झाला नाही. रिझर्व्ह बँकेने घेतलेली यातील भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली.

2008 मध्ये भारतीय बाजाराने 20 हजारांचा पल्ला गाठला होता. 2009 च्या मार्च महिन्यात भारतीय बाजार मंदीच्या भीतीने इतके घसरले की, बाजार आठ हजारांवर आला होता.

WD
WD
चालू वर्षात सर्वात मोठा फटका बसला तो देशातील निर्यातदारांना. सलग 13 महिन्यात निर्यात क्षेत्रातील घसरण चालूच होती. या घसरणीला चालू वर्षातील अखेरच्या काही महिन्यांमध्ये ब्रेक लागला असून, निर्यात क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

या वर्षाचा सारासार विचार करता वर्षात आर्थिक मंदीने साऱ्यांचीच गणितं चुकवली. मंदी ओसरत असली तरी दुबई वर्ल्ड प्रमाणे काही धक्के अजूनही जगातील अनेक देशांना बसत आहेत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments