Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी गोसावी समस्त त्रैलोक्याचा

Webdunia
ज्यांची कीर्ती कस्तुरी अखिल भारत वर्षात दरवळत आहे, असे महान लोकोत्तर महापुरुष आणि परम आदरस्थान असलेले महान अवतार सद्गुरुश्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली शिर्डी आज जागतिक पातळीवर साधनाभूमी आणि समाधीभूमी म्हणून परिचित आहे. अहमदनगर जिल्ह्यात अर्वाचीन काळात एक महान यग्याच्या आगमनाने आणि अकृत्रिम प्रेममुग्ध सहवासामुळे त्या स्थानास महत्त्व आलं. ते धाम म्हणजे शिर्डी. शिर्डीचे अतिप्राचीन नाव ‘शिलधी’ शके 1212 च्या दरम्यान यदुवंशी राजा रामदेवराय यादव याच्या कारकीर्दीत या भागात जुन्या वाड्याचे फक्त अवशेषच काय ते उरलेले होते. भग्नावस्थेत असलेल्या त्या गावाचा उपोगय केवळ मृतांना जाळण्या-पुरण्यासाठी करण्यात येऊ लागला. या शिलधीचेच पुढे शिर्डीत रुपांतर झाले. ‘शिलधी’ हा शब्द श्री बाबांनी आपल्या कठोर तपोबलाने पुढे प्रभावी बनविला आणि पवित्रतेचे धाम म्हणजेच ‘शिलधी’ अशा अर्थाने त्या नावाचे अक्षरश: शिर्डी क्षेत्रात रुपांतर करून टाकले. श्री साईबाबांचे वास्तव्य शिर्डीत कित्येक वर्षे होते. 1910 सालार्पत त्यांची नगर किंवा शिर्डीबाहेर फारशी प्रसिध्दी नव्हती. पण त्या आधी ते सुरुवातीला निंबवृक्षाखाली मौनधारण करून बसत. दिवसरात्र भोजन न करता त्यांनी बारा वर्षे कठोर तपश्र्चर्या करून सार्‍या भारतात श्रेष्ठ संत म्हणून कीर्ती संपादित केली. त्या काळात जे जे योगी, सिध्द, तपस्वी शिर्डी श्री बाबांच्या दर्शनार्थ आले त्या सर्वाची खात्री पटली होती की, श्री साईबाबा हे महान दत्तावतारी सत्पुरुष आहेत. ते योगीयांचे योगी, गुरुंचे गुरु आहेत. सर्वसाक्षी, सर्वज्ञ, आनंदमय, निरजंन आहेत. 

बीदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथील महान साक्षात्कारी संत माणिकप्रभू यच्याशी साईबाबांचे संबंध आल्याचही समजते. एकदा अवतारी महापुरुष माणिकप्रभू यच्या भक्तदरबारात एक फकीर गेले होते. तेथे जाऊन त्यांनी लोटा पुढे करून भिक्षा मागितली आणि माणिकप्रभूंनी त्या लोट्यात दोन खारका आणि गुलाबफुले टाकली आणि ‘साई ये लेव’ असे म्हटले आणि हां हां म्हणता तो फकीर अदृश्य झाला. हा फकीर म्हणजे साक्षात साईबाबा होते. ‘साई’ या शब्दाचा हिंदीतील अर्थ साधू, संत, संत्पुरुष असा होतो. त्यामुळेच या महापुरुषाला ‘साई’ हे नाव पडले. महात्मे आपल्या केवळ अस्तित्वाने आध्यात्मिक शक्तीची लाट उसळून देतात. त्यांची ठायी अपार पुण्यराशी साठलेल्या असतात. त्यामुळे देहत्यागानंतरही जगदोध्दाराचे त्यांचे कार्य अखंडपणे चाललेले असते. त्यांच्या केवळ नामसंकीर्तनाने संसारबंधन तुटून जाते. जीवन कृतार्थतेचा तत्काळ अनुभव देण्याचे अलौकिक सामर्थ्य अशा पुण्पुरुषांच नामस्मरणामध्ये असते. जे साईभक्त झाले त्यांची नामस्मरणाने जन्म -मरणाची येरझारा चुकेल. सर्व पापे जळून भस्म होतील.

श्री साईबाबांना सर्व रिध्दी, अष्टौ सिध्दी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे योगसामर्थ्य अद्वितीय होते. ते अंर्तज्ञानी योगी होते. ते प्रसंगी पर कायाप्रवेश करीत असत. त्यांना पूर्वजन्मीचेही ज्ञान होते. ते अजानुबाहू होते. श्री साईबाबा शेगावच्या गजानन महाराजांना आपले गुरुबंधू मानीत असत. गजानन महाराज शेगावी जेव्हा समाधीस्थ झाले, तेव्हा तेथे शिर्डीत श्री बाबा ‘माझा गज निघून गेला’ म्हणून शोक करू लागले. भक्तांना बाबा असे का करतात, हे समजेना. अखेर बाबांच्या अनावर शोकाचे कारण समजले.

बाबांना अंतज्ञानान ही गोष्ट समजली होती. श्रध्दा, सेवा आणि सबुरी हा साईबाबांचा सुवर्ण संदेश आहे. तो त्यांनी जगाला दिला. त्याशिवाय श्री बाबांनी अखेर भक्तांना शिकवण दिली. ‘एकटे कधी खाऊ नका आणि अन्नदान करा. द्रव्यापाशी देव नाही व द्रव्य लोभला मोक्ष नाही’ असे ते भक्तांना आवर्जून सांगत. त्यानुसार साईभक्त श्री साईबाबा उत्सवानिमित्त ठिकठिकाणी मोठमोठे भंडारे आयोजित करून अन्नदान करत आहेत. बाबांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments