Dharma Sangrah

आरती साईनाथांची

Webdunia
WD
जय दे जय देव जय साईनाथा।। श्री सद्गुरुनाथा।।
विश्वंभरा विश्वेशा । तारक तू जगता ।।धृ।।
ब्रह्मांडाचा नायक देवा तू कळले।
प्रत्यय निजभक्तांचे अद्भुत दावियेले।।
ब्रह्मा विष्णू शंकर गणपती तू त्राता।
भजतां तव पदकमला ‍हरिसी भवचिंता।।1।।
हरूनि दारिद्र्याते रंका रक्षियले।
रोगग्रस्तां तुझिया उदिनें तारियले।।
वांझेसी तोषविलें देऊनिया पुत्रा।
जो जो वांछिल त्यांचा तू अससी दाता ।।2।।
ज्ञानरवी तू दिधले ज्ञान अज्ञाना।
सन्मार्गा लावुनिया उद्धरिले त्यांना।।
ऐशी तू सकलांची ममताळू माता।
रोमांचित तनु होई गुण महिमा गातां।।3।।
यमपाशा तोडुनी तू भक्त सोडविले।
आयुर्बल देऊनि त्या सकला तोषविले।।
ऐसे सामर्थ्याचे प्रताप तव गातां।
शिणली मति मग आलों शरण तुला नाथा।।4।।
मद्वचनी विश्वासुनि जे सेवा करिती।
त्यांची चिंता लागे रात्रं‍दिन मजसी।।
ऐसे दृढ आश्वासन दिधलेसी जगता।
करुणेचा सागर तू अससी गुरुनाथा।।5।।
समतेची योगाची मूर्ती श्री साई।
रिद्धिसिद्धी घेती लोळण तव पायीं।।
अंतर साक्षी तुजला सर्वांची वार्ता।
अगम्य तुजला कांहीं ऐसा तू ज्ञाता ।।6।।
लाभे फळ करितां तव नवस समाधीला।
दाखविसी अद्यापी निज साद लीला।।
सर्व पहा

नवीन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची

एकादशी हे व्रत पूर्ण फळदायी व्हावे यासाठी काही विशेष नियम पाळणे आवश्यक मानले जाते

10 Names of Shani प्रत्येक शनिवारी 10 नावांचा जप करा, शनिदेव प्रसन्न होतील

आरती शनिवारची

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

Show comments