Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kojagiri Pornima 2023 : कोजागिरी पौर्णिमा पूजा विधी

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (08:02 IST)
Kojagiri Pornima 2023 : शरद पौर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. याला रास पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा, आश्विनी पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत असेही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. असे म्हटले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणे अमृतसारखी असतात, म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दुध  तयार करतात आणि रात्री चंद्रप्रकाशात ठेवतात आणि नंतर प्रसाद म्हणून खातात. शरद पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घर नेहमी ऐश्वर्याने भरलेले राहते. या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने ऐश्वर्य प्राप्ती होते. चला तर मग पूजा विधी जाणून घेऊ या.
 
शरद पौर्णिमेला संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र धारण करावे.
या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरी देवी लक्ष्मी, ऐरावतावर बसलेल्या इंद्र आणि बळीराजा यांची पूजा करावी.
या दिवशी लक्ष्मी देवीच्या व्रताचं संकल्प करावं.
पूजा स्थळी लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
विधिपूर्वक पूजा करावी.
देवीला अक्षता, दूर्वा, लाल सूत, सुपारी, चंदन, पुष्प हार, नारळ, फळं, मिठाई अर्पित करावं.
नंतर तुपाच्या दिव्याने किंवा कापुराने देवीची आरती करावी.
पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पित करुन व आप्तेष्टांना देऊन स्वत: सेवन करावे.
चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा.
यानंतर रात्री चंद्र दर्शन झाल्यावर तुपाचे 100 दिवे लावावे.
दुसऱ्याच्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करावे.
अशात मध्य रात्री लक्ष्मी विचरण करत असताना आपल्यावर कृपा दृष्टी होईल.
कोजागरी व्रत केल्याने देवी प्रसन्न होते आणि धन- समृद्धी प्रदान करते.
मृत्यूनंतर परलोकात देखील सद्गती प्रदान करते.




Edited by - Priya Dixit       
 
 

संबंधित माहिती

आरती गुरुवारची

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

Maa Baglamukhi Mantra तिन्ही लोकात शक्ती देतं माँ बगलामुखीचा मंत्र

आरती बुधवारची

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

पुढील लेख
Show comments