Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवरायांची दूरदृष्टी

Webdunia
MH GovtMH GOVT
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार कसा होता, हे अभ्यासायचे असेल तर त्यासाठी रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेली आज्ञापत्रे वाचायला हवीत. हा ग्रंथ १९ नोव्हेंबर १७१५ रोजी पूर्ण झाला. त्यात व्यापारी म्हणून आलेल्या परकीयांच्या संदर्भातील धोरणही मांडले आहे. ' साहूकार' या प्रकरणात त्यांनी इंग्रज, फ्रेंच, आदी युरोपीय व्यापार्‍यांसंबंधी वर्तविलेले भविष्य पुढे खरे ठरले.

त्यात ते लिहितात, ''साहुकारांमध्ये फिरंगी व अंग्रेज व वलंदे व फरासीस व डिंगमारादी टोपीकर हेही लोक सावकारी करितात. परंतु ते वरकड सावकारासारखे नव्हेत. यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करीत आहेत. त्यांचे हुकमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती साहुकारीस येतात. राज्य करणारास स्थळ लोभ नाही असे काय घडो पाहते? तथापि टोपीकरांस या प्रांती प्रवेश करावा, राज्य करावे, स्वमते प्रतिष्ठावी, हा पूर्णाभिमान. तद्नुरूप स्थळोस्थळी कृतकार्यही झाले आहेत. त्यास ही हट्टी जात. हातास आले स्थळ मेल्यानेही सोडावयाचे नव्हेत. याची आमदरफ्ती आले गेले इतकीच असो द्यावी. कदाचित वखारीस जागा देणे झाली तर खाडीचे मोबारी समुद्रतीरी न द्यावी. तसे ठिकाणी जागा दिल्याने आरमार पाठीशी देऊन त्या बंदरी नूतन किल्लाच निर्माण करणार. तेव्हा इतके स्थळ राज्यातून गेले.''

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments