Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्राद्ध महिमा

वेबदुनिया
‘श्रद्धा क्रियते तत् श्रद्धम:’ श्रद्धेने पितरांना, मृत व्यक्तींना उद्देशून विधिवत् हविषयुक्त पिंडदान आदी कर्मे करणे यालाच श्राद्ध म्हणतात. जे निमित्त श्रद्धादि कर्मे करतात. त्यांना पितर संतुष्ट हेऊन आयुष्य, कीर्ती, बल, धन, पुत्र, संसार-सुख, आरोग्य व सन्मान प्राप्त करवितात. पितर हेच कुळाचे रक्षक आहेत. ऐहिक व पारालौकिक सुख पितरांमुळेच मिळते.

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला महालय पक्ष किंवा पितृपक्ष असे म्हणतात. हा पंधरवडा पितृकार्याला अत्यंत योग्य आहे. कारण या पक्षात पितर यमलोकातून पृथ्वीवर आपल्या नातेवाईकांच्या घरी वास्तव्यास येतात, अशी समजूत आहे.

यात एक दिवस श्रद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त होतात. या पंधरवडय़ात रोज श्रद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याची प्रथा आहे. हे श्राद्ध पितृत्रयी- पिता, पितामह, प्रपितामह, मातृत्रयी- माता, मातामही, प्रपितामही, सापत्न-माता, मातामह, मातृपितामह, मातामही, मातृपितामही, पत्नी, पुत्र, कन्या, मातुल, बंधू, आत्या, जावई, सासू-सासरा, आचार्य, उपाध्य, गुरु, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रित्यर्थ करावयाचे असते.

चतुर्थी किंवा पंचमीला भरणी श्राद्ध, नवमीला सौभाग्वती गेली असल्याचे तिचे श्राद्ध, त्रयोदशीला लहान मुलांच्या नावाने व चतुर्दशीला अपघातात मृत्यू पावलेल्या वक्तीच्या नावाने श्रद्ध करतात.

आई-वडील मुलांसाठी सर्व आयुष्य वेचतात त्यांचे पितृऋण फेडण्यासाठी वर्षातून एक दिवस त्यांचे श्राद्धकर्म श्रद्धेने, कृतज्ञतेने केले तर पितरांना आनंद होतो. ते तृप्त होऊन मुलाला, कुटुंबीयांना आशर्वाद देतात.

पितर त्यांच्या कर्मप्रमाणे नरकयातना भोगीत असतील तर त्यांना त्या यातनातून सोडवण्यासाठी श्रद्धकर्मे निष्ठेने करावयास हवी.

ते एक पुण्कर्म आहे. विधिवत केलेले श्राद्ध पितर ज्या योनीत असतील, तेथे त्यांना प्राप्त होते. पितर देवलोकांत गेला असेल तर भोगरूपाने, पशू झाला असेल तर तृणरूपाने, प्रेत झाला असेल तर रूधीर रूपाने व मनुष्य झाला असेल तर अन्न पानादि रूपाने शुद्ध असे श्रद्ध अन्न त्यांना मिळते. आणि मनापासून श्राद्ध केले नाही तर पितर म्हणून त्यांना हविभोग न मिळाल्याने वंशजाला ते भयानक त्रास देतात, अडचणी आणतात, त्यांना गती न मिळाल्यामुळे प्रक्षुब्ध होतात. तर यासाठी वंशजांनी त्यांना गती मिळण्यासाठी श्रद्धादिवशी प्रार्थना करावी. ‘तुम्ही आता या लोकांत गुंतून पडू नका तुमचा या लोकांशी संबंध तुटला आहे. तुम्ही आता तुमच्या पुढील मार्गाकडे लक्ष द्या. तुमच्या श्रेय व मोक्ष यासाठी आम्ही तुम्हाला स्मरण करून देत आहोत.’

अशा प्रकारची प्रार्थना ज्यांनी अन्तेष्ठी विधि, दशक्रिया नीट न होणे, श्रद्धादि कर्माचा लोप होणे, वाईट कृत्ये करून कुणाचा तळतळाट घेतलेले, अपघातात गेलेले यच्यासाठी अवश्य करावी. नाहीतर ते वंशजांना त्रास देतात.

म्हणून वर्षातून त्यांच्यासाठी कृतज्ञतापूर्वक, मनापासून त्यांचे सर्व श्रद्धविधि करावेत, व त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
सर्व पहा

नवीन

वटपौर्णिमा आरती

वटपौर्णिमा कथा मराठी

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा Vat Purnima 2024 Wishes In Marathi

वटपौर्णिमा संपूर्ण माहिती Vat Purnima Information In Marathi

25 जून रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी, शुभ मुहूर्त- पूजा विधी आणि अंगारकी चतुर्थी श्लोक

सर्व पहा

नक्की वाचा

वजन कमी करण्यासाठी वापरलं जाणारं 'हे' औषध ठरू शकतं धोकादायक, WHO चा इशारा

सीएम केजरीवाल यांची तुरुंगात प्रकृती बिघडली, वजन 8 किलोने घटले

भारतीय टेनिस स्टार सुमित नागल पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला

ना पाणी, ना सावली; शेकडो हज यात्रेकरूंचा उष्माघातानं मृत्यू, सौदी अरेबियात नेमकं काय घडलं?

NEET पेपर लीक प्रकरणी बिहार पोलिसांनी झारखंडच्या देवघरमधून 6 जणांना अटक केली

पुढील लेख
Show comments