उनसावली चा खेळ आवडे, रूप तुझं रे खूप भाबडे, क्षणात येई राग तुला रे, लगेचच शांत कसा होई रे? फुलांचा धुंद सुवास ही येई, सणा सुदी ची नांदी ही होई, हुरहूर माहेर ची लागे जीवा, मातीतून ही हुंकार तो यावा, दूर रानी वाजे वेणू, हंबरती गायी, लुसलुशीत गवत खावंया ती...