श्रीगणेशाय नमः ॥ जेथे शिवनामघोष निरंतर ॥ तेथे कैचे जन्ममरणसंसार ॥ तिही कळिकाळ जिंकिला समग्र ॥ शिवशिवछंदेकरूनिया ॥१॥ पाप जळावया निश्चिती ॥ शिवनामी आहे ज्याची आसक्ती ॥ त्यासी नाही पुनरावृत्ती ॥ तो केवळ शिवरूप ॥२॥ जैसे प्राणियाचे चित्त ॥ विषयी गुंतले अत्यंत ॥ तैसे शिवनामी होता रत ॥ तरी बंधन...