हिंदू धर्मात नागपंचमी सणाला खूप महत्त्व आहे. नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी सर्पदेवतेची पूजा करून सापाला दूध पाजल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात, असे मानले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष, पितृदोष किंवा सापांची भीती असते त्यांनी नाग पंचमीच्या दिवशी काही विशेष उपाय करावेत (नाग पंचमी 2022 मंत्र) असे शास्त्रात सांगितले आहे. कारण या सर्वांमुळे माणसाच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात. त्यामुळे या सर्वांपासून मुक्त होण्यासाठी व्यक्तीने श्री सर्प सुक्त स्तोत्राचे पठण करावे.