Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Baisakhi शीख धर्मियांचा प्रमुख सणं : बैसाखी

Webdunia
शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (08:34 IST)
बैसाखीपासून शीख लोकांच्या नववर्षास सुरवात होते. यंदा बैसाखी 14 एप्रिलच्या येत आहे.  या महिन्यापासूनच ते पेरणीस सुरवात करतात. 1699 साली याच दिवशी शीखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी 'खालसा' पंथाची स्थापना केली होती. 
 
यासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एकदा गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांपुढे जाऊन विचारले, की या तंबूत प्रवेश मिळवण्यासाठी कोण आपले प्राण देऊ शकेल? एक जण पुढे आला. त्याला घेऊन गुरू गोविंदसिंग तंबूत गेले. 
 
थोड्या वेळात रक्ताने माखलेली तलवार घेऊन बाहेर आले. त्यांनी परत तोच प्रश्न विचारला व अशी कृती आणखी चार वेळा केली. काही वेळाने ते पाचही जण पगडी बांधून बाहेर आले. 
 
त्या पाच लोकांना नंतर पाच पैर म्हटले जाऊ लागले. या दिवशी गुरूद्वारात जाऊन शीख बांधव प्रार्थना करतात. खालसा पंथाचा निर्माण दिवस म्हणूनही या दिवसाचे वेगळे महात्म्य आहे. 
 
या दिवशी मिरवणूक काढली जाते. पंजाबमध्ये लोक पारंपारिक नृत्य, भांगडा करतात. संध्याकाळी शेकोटी पेटवितात व नवीन पेरण्या चांगल्या व्हाव्यात म्हणून प्रेरणा देतात. मुख्य समारंभ आनंदपुर साहिब येथे होतो. 
 
सकाळी चार वाजता 'गुरू ग्रंथसाहिब'ला समारंभपूर्वक बाहेर आणले जाते. नंतर गादीवर बसविले जाते व मिरवणूक काढली जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

मारुतीची निरंजनस्वामीकृत आरती

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Christmas 2024: गोव्यातील या ठिकाणी ख्रिसमस साजरा करा

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments