Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वतःत देव पहायला लावणारा असा हा शीख धर्म

देव
वेबदुनिया
शीख धर्माची स्थापना गुरू नानक यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये केली. जगभरात एकूण दोन कोटी शीख राहतात. त्यातील बहुतांश पंजाबमध्ये राहतात. ब्रिटनमध्येही जवळपास पाच लाख शीख वास्तव्य करतात.

शीख हा जगातला पाचवा सर्वांत मोठा धर्म आहे. गुरू ग्रंथसाहिब हा शीखांचा धर्मग्रंथ आहे. शीखांचे एकूण दहा गुरू आहेत. त्यातील पहिले गुरू नानक. त्यांच्यानंतर नऊ गुरू झाले.

दहावे गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की माझ्या मृत्यूनंतर गुरू ग्रंथ साहिबा यालाच आपले गुरू माना व त्यात सांगितल्याप्रमाणे आचरण करा. त्यामुळे पुढे गुरूंची परंपरा बंद झाली.

शीख हा शब्द मुळ संस्कृतमधुन आला आहे. त्याचा अर्थ होतो शिष्य. शीख हे एकेश्वरवादी आहेत. ते देवाला 'वाहे गुरू' म्हणतात. तो अकाल व निरंकार आहे असे ते मानतात. धार्मिक कार्य करत बसण्यापेक्षा चांगले कृत्य करण्याला ते प्राधान्य देतात.

पूजेसाठी ते ग ुरुद्वारात जातात. दिवाळी, बैसाखी, गुरूपर्व हे सण ते मोठ्या उत्साहाने साजरे करतात. अमृतसर येथील सुवर्णमंदिर शीखांचे पवित्र धर्मस्थळ आहे.

महाराष्ट्रातील संत नामदेव भारतभर यात्रेसाठी फिरत असताना पंजाबात गेले होते. त्यांनी तेथे दिलेली प्रवचने नंतर 'गुरू ग्रंथसाहिब'चा भाग बनली आहेत.

शीख धर्माची शिकवण-

देवाला ह ृदयात ठेवा
प्रामाणिकपणे जगा व भरपूर कष्ट करा
सर्वांशी समान वागा
दुसरयांची सेवा करा
दैवावर जास्त विश्वास ठेऊ नका.
सर्व पहा

नवीन

अन्वयव्यतिरेक

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

श्री विठ्ठल मंदिर हंपी कर्नाटक

आरती बुधवारची

Budhwar puja vidhi : बुधवार वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

Show comments