Marathi Biodata Maker

कटलेट्स

Webdunia
MHNEWS
साहित् य - २ वाटय़ा चिरलेले केळफूल, २ बटाटे, २ कांदे लसूण, १ इंच आले, ७,८ मिरच्या, २ टोमॅटो, ४ स्लाईस ब्रेड, २ चमचे मटणाचा मसाला, अर्धी वाटी रवा, १ इंच दालचिनी, ४,५ लवंगा.

कृती - केळफूल बारीक चिरुन घ्यावे व पाण्यात टाकावे म्हणजे सर्व राप (काळे पाणी) निघून जाईल. कांदा बारीक चिरुन घ्यावा. बटाटे उकडून साले काढून कुस्करुन घ्यावे. लसूण, आले, मिरच्या बारीक वाटून घ्यावे व ते केळफुलाला लावून ठेवावे.

२ चमचे डालडामध्ये कांदा फोडणीला टाकावा. चांगला गुलाबीसर झाल्यावर त्यावर चिरलेले केळफूल टाकावे. टोमॅटो चिरुन टाकावे. मंद आचेवर चांगले शिजल्यावर त्यावर मटणाचा मसाला, मीठ टाकून अगदी सुके होईपर्यंत शिजवून घ्यावे.

गार झाल्यावर त्यात कुस्करलेला बटाटा, ब्रेडचे स्लाईस (पाण्यात भिजवून पिळून काढावे) घालून चांगले मळून घ्यावे. लहान लहान गोळे करुन हाताने जरा चपटे करुन रव्यावर घोळवावे आणि तव्यावर तेल टाकून मंद आचेवर तळून काढावे.

कोणतीही चटणी व टोमॅटो सॉस ह्याबरोबर चांगले लागते.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी सोपा उपाय

महाराष्ट्रीयन पद्धतीचे झणझणीत मसालेदार वांग्याचे भरीत; दुपारच्या जेवणासाठी अगदी उत्तम बेत

काखेतल्या घामाच्या डागांमुळे तुमचा संपूर्ण लुक खराब होत आहे का? या सोप्या युक्त्या वापरून पहा

तुमचा पार्टनर खरंच Loyal आहे? या संकेतांवरून ओळखा

भारतात पुन्हा नव्या व्हायरसची एन्ट्री? जाणून घ्या सत्य

Show comments