Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंग्लंडविरूद्ध वापरावे लागेल मिश्राचे अस्त्र

मनोज पोलादे
PTI
PTI
लेगस्पिनर इंग्लंडची कमजोरी असल्याचे माहित असतानाही आपण लॉर्ड्स कसोटीत ऑफस्पिनर हरभजनला खेळवले. हरभजनने तब्बल ५६ षटक् गोलंदाजी करून फक्त १ बळी घेतला. हरभजनने पहिल्या डावांत प्रविण कुमार आणि दुसर्‍या डावांत ईशांत शर्मास साथ दिली असती तर कसोटीचा निकाल कदाचित वेगळा राहिला असता. हरभजनने त्याचेवर प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून असलेली जबाबदारी चोख पार पाडली नाही. त्यातच झहीर जखमी झाल्याने भारताचा घात झाला आणि लॉर्ड्स टेस्ट इंग्लंडच्या खिशात गेली.

इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या पंधरा सदस्यीय संघात लेगस्पिनर अमित मिश्राचा समावेश आहे. आपण एक उत्कृष्ट लेगस्पिनर असल्याचे त्याने वारंवार सिद्धही केले आहे. ट्रेंट ब्रिज येथे होणार्‍या दुसर्‍या कसोटीत हरभजनऐवजी त्याला खेळवल्यास इंग्लंडच्या वरमावर बोट ठेवण्यासोबतच तो निदान ४-५ गडी बाद करून वाटा तरी उचलेल. प्रमुख फिरकी गोलंदाजाने टेस्ट मध्ये निदान इतके करणे तरी अपेक्षित आहे.

हे भारतीय संघव्यवस्थापनास माहित नाही असे नाही मात्र हरभजनच्या पलीकडे विचार करण्याची त्यांची मानसिक तयारी नाही. गोलंदाजांस किती अनुभव आहे यापेक्षा त्याच्यात किती क्षमता आहे आणि प्रतिस्पर्धी संघाची कमजोरी कोणती आहे, हे हेरणे महत्त्वपूर्ण असते. आणि अमित मिश्रा काही इतका नवखा नाही की त्याचेवर विश्वास दाखवता येणार नाही. त्याने भारताकडून विविध प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध खेळताना ११ टेस्टमध्ये ४० गडी बाद केले आहे. आणि ही कामगिरी निश्चितच आंतरराष्ट्रीय गोलंदाजास साजेशी आहे. मिश्रावर विश्वास दाखवल्यास त्याच्यातही कोणत्याही संघाविरूद्ध टक्कर घेण्याची हिम्मत दुणावेल.
भारतीय संघव्यवस्थापनास माहित नाही असे नाही मात्र हरभजनच्या पलीकडे विचार करण्याची त्यांची मानसिक तयारी नाही. गोलंदाजांस किती अनुभव आहे यापेक्षा त्याच्यात किती क्षमता आहे आणि प्रतिस्पर्धी संघाची कमजोरी कोणती आहे, हे हेरणे महत्त्वपूर्ण असते. आणि अमित मि


लेगस्पिनरविरूद्ध इंग्लंडची कामगिरी बघायची झाल्यास त्यांच्याविरूद्ध शेन वॉर्नने घेतलेल्या बळींची संख्या डोळे उघडणारी ठरेल. वॉर्नने इंग्लंडविरूद्ध ३१ टेस्टमध्ये १७२ बळी घेतले आहेत. याचा अर्थ इंग्लिश गोलंदाज लेगस्पिनरसमोर अक्षरश: नांगी टाकतात, शरणागती पत्करतात. अमित मिश्रा वॉर्न इतका प्रतिभाशाली नसणार मात्र त्याच्यातही क्षमता खच्चून भरली आहे फक्त भारतास त्याचा वेळेत योग्य वापर करता आला पाहिजे. पूर्णपणे हरभजनवर अवलंबून राहिल्यापेक्षा प्रतिस्पर्धी संघ कोणता यानुसार भारतास दोघांनाही संधी देऊन संतुलन राखता आले पाहिजे.
वॉर्नने इंग्लंडविरूद्ध ३१ टेस्टमध्ये १७२ बळी घेतले आहेत. याचा अर्थ इंग्लिश गोलंदाज लेगस्पिनरसमोर अक्षरश: नांगी टाकतात, शरणागती पत्करतात. अमित मिश्रा वॉर्न इतका प्रतिभाशाली नसणार मात्र त्याच्यातही क्षमता खच्चून भरली आहे


हरभजनने ९७ कसोटीत ४०५ बळी घेतले असेल मात्र इतक्यातल्या त्याच्या कामगिरीवर नजर टाकल्यास निश्चितच समाधानकारक नाही. तो भारतासाठी मॅच विनर गोलंदाज ठरत नाहीये, इतकेच काय दुसर्‍या गोलंदाजास साथ देऊन विजयात महत्त्वाचा वाटाही उचलत नाही. तो फक्त षट्कामागून षट्क टाकून आपला गोलंदाजी कोटा पूर्ण करण्याचे सोपस्कार पार पाडतो. मिश्रास संधी मिळाल्यास हरभजनला विश्रांती मिळून थोडे कौशल्यावरही काम करता येईल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करत टिकून राहण्यासाठी‍ गोलंदाजीत सतत नवनवे प्रयोग करण्यासोबतच नवीन कौशल्य आत्मसात करत राहावे लागते. वॉर्न किंवा मुरलीधरणने तेच केले यामुळेत निवृत्ती घेईपर्यंत फलंदाजांवर त्यांचा धाक कायम होता. आणि इतका काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तळपून त्यांनी कोणत्याही गोलंदाजास अशक्य वाटावी अशी कामगिरी केली आहे.

हरभजनला त्यांच्याकडून काही प्रेरणा घ्यावी लागेल, काही शिकावे लागेल. त्याने निदान अनिल कुंबळेकडून काही बोध घेतला तरी चालेल. कुंबळेने क्रिकेटला अलविदा करेपर्यंत कधीही आपला धाक कमी होऊ दिला नाही आणि भारताच्या विजयात नेहमी वाटा उचलला, फक्त एक नाममात्र सदस्य होऊन तो कधी वावरला नाही. हरभजनला मधामधात विश्रांती घेऊन आत्मचिंतन करावे लागेल, तरच त्याच्या दृष्टिकोणात बदल होईल.

इंग्लंड दौर्‍यात उर्वरित तीन टेस्टमध्ये भारतीय संघव्यवस्थापनाने कठोर निर्णय घेण्यासोबतच दुरदृष्टि दाखवली तरच भारताकडे उपलब्ध प्रतिभेस न्याय मिळेल आणि टेस्टमध्ये भारताची बादशाहत कायम राहिल, अन्यथा इंग्लंडसारखा तगडा प्रतिस्पर्धी नंबर एकवर पोहचण्यासाठी सज्जच आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही, पुढील दोन कसोटींसाठी अनफिट घोषित

IND vs AUS: टीम इंडियाच्या संघात मोठा बदल, BCCI ने निर्णय घेतला

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

हरमनप्रीत कौरने इतिहास रचला,हजार धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय कर्णधार ठरली

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाकिस्तान मेगा मॅच होणार

Show comments