Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केव्हिन पीटरसन: एक झंझावाती वादळ

मनोज पोलादे
इंग्लंडचा झंझावाती फलंदाज केव्हिन पीटरसनने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर करून तमाम क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सतत चांगली कामगिरी करत असताना फक्त ३२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावरून दूर होण्याचा निर्णय पचणी पडणारा नाही. बलाढ्य संघांविरूद्ध आव्हान घेत किल्ला लढविणार्‍या लढवय्यास मुकावे लागण्याचे दु:ख क्रिकेट रसीकांना यापुढे पचवावे लागणार आहे.

PTI
PTI
२००५ मधील एशेज मालिकेतील त्याची १५८ धावांची झुंजार ऐतिहासिक खेळी आजही क्रिकेट रसीक विसरले नाहीत. आव्हानात्मक परिस्थितीत अपवादात्मक खेळ्या करण्यासाठीच हा फलंदाज जन्मला आहे. १९८६-८७ मध्ये ऐतिहासिक एशेजच्या सुरूवातीच्या मालिकेत इयान बोथमने ऑस्ट्रेलियास नामोहराम केले होते. तेव्हापासून इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाची एशेजमधील ही सर्वात महत्त्वाची इनिंग होय.

एशेज मालिका ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा. २००५ साली या मालिकेतील निर्णायक कसोटीत चौथ्या डावात त्याने १५८ धावांची झुंजार खेळी करत इंग्लंडची १८ वर्षांनी एशेजची स्वप्नपूर्ती त्याने केली होती. पाकिस्तानविरूद्धची सामना जिंकून देणारी १३०
चौथ्या डावात त्याने १५८ धावांची झुंजार खेळी करत इंग्लंडची १८ वर्षांनी एशेजची स्वप्नपूर्ती त्याने केली होती.
धावांची तडाखेबंद खेळी, ही त्याची कारकीर्दीतील सर्वोत्तम वनडे इनिंग होय. ही खेळी त्याने फेब्रुवारी २०१२ मध्ये केली. यंदा २०१२ मध्ये आयपीएल स्पर्धेत त्याने टी-ट्वेंटी क्रिकेटमधील कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. ६४ चेंडूत १०३ धावांची तडाखेबंद खेळी केली. यामध्ये ६ चौकार ९ उत्तुंग षटकाराची आतिषबाजी करत त्याने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात त्याचा झपाट्याने उदय होऊन तो शीखरावर पोहचला. त्याच्यावर पॉल कॉलिंगवुडनंतर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र रोखठोक व्यक्तिमत्त्वामुळे त्याची ही कारकीर्द अल्पायुषी ठरली. खेळाडू म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये कमावलेल्या लौकिक तो कर्णधार म्हणून स्थापित करू शकला नाही. येथूनच निराशावादाच्या तिरीपाने त्याच्या विश्वात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. फ्रस्टेशनने त्याच्या
खेळाडू म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये कमावलेल्या लौकिक तो कर्णधार म्हणून स्थापित करू शकला नाही. येथूनच निराशावादाच्या तिरीपाने त्याच्या विश्वात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
वर क्विचितप्रसंगी ताबा मिळवला मात्र 'फायटर' पीटरसन त्यावरही मात करत राहिला, संघर्ष करत राहिला. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीवर याचा काहीअंशी प्रभाव पडला, मात्र वारंवार दमदार कामगिरी करत त्याने कसलेला अव्वल दर्जाचा खेळाडू असल्याचे परत-परत सिद्ध केले.


रोखठोक व परखड मते व्यक्त करण्यामुळे तो पुष्कळदा वादात अडकत असतो. मात्र त्याला त्याची चिंता नाही, पॉलिटीकली करेक्ट असण्यापेक्षा खरे व योग्य ते परखडपणे मांडण्यास त्याने नेहमीच प्राधान्य दिले आहे. फलंदाजीतही त्याच्या याच स्वभावाचे प्रतिबिंब उमटते. वैयक्तिक विक्रमांपेक्षा तो संघहितास अधिक प्राधान्य देतो. विरोधक जिताका खमका तितका त्याचा खेळ बहरतो. मैदान मारण्यात त्याच्यासारखा योद्धा सा
रोखठोक व परखड मते व्यक्त करण्यामुळे तो पुष्कळदा वादात अडकत असतो. मात्र त्याला त्याची चिंता नाही, पॉलिटीकली करेक्ट असण्यापेक्षा खरे व योग्य ते परखडपणे मांडण्यास त्याने नेहमीच प्राधान्य दिले आहे.
पडणार नाही. सोबतच तो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजनही करतो. भल्याभल्या गोलंदाजांना चारीमुंड्या चीत करण्यात त्याचा हातखंडा आहे.

सद्या इतक्या चांगल्या फॉर्म मध्ये असताना त्याने वनडे क्रिकेटला अलविदा करणे कोड्यात टाकणारे आहे. क्रिकेटच्या मैदानावर वादळं निर्माण करणार्‍या या झंझावाती क्रिकेटपटूंच्या अर्तमनातही काही वादळं घोंघावत असणार आणि त्यातूनच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला असवा. मात्र क्रिकेट चाहत्यांच्या स्मृतीत पीटरसन नावाचे वादळ नेहमी घोंघावत राहिल, हे नक्की!

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

हरमनप्रीत कौरने इतिहास रचला,हजार धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय कर्णधार ठरली

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाकिस्तान मेगा मॅच होणार

IND vs AUS: कर्णधार रोहित सराव दरम्यान जखमी गुडघ्याला दुखापत

स्मृती मंधानाने या मालिकेत एकूण सहा विक्रम केले

Show comments