Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिंकेल तो खेळेल फायनलमध्ये विश्वकरंडकासाठी

मनोज पोलादे
ND
ND
विश्वकरंडकाच्या रणांगणात मंगळवारी श्रीलंका आणि न्यूझीलँड संघादरम्यान तुंबळ युद्ध रंगणार असून विजेता संघ फायनलमध्ये करंडकासाठी झुंजेल. श्रीलंकेने क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंडची वाघासारखी शिकार केली तर न्यूझीलँडने दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघाचा मानहानिकारक पराभव केला आहे.

दोन्ही संघांची क्षमता आणि मैदानावरील कामगिरी बघता ही लढत तुल्यबळ होईल हे सांगण्यासाठी भविष्यव्येत्त्याची गरज नाही. न्यूझीलँडच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे आणि विश्वकरंडकात अष्टपैलू कामगिरी असणारा संघाने मोठमोठ्यांना पाणी पाजल्याचा इतिहास साक्षी आहे. १९८३ मध्ये कपीलच्या नेतृत्वाच भारतीय संघाने त्यावेळच्या विंडीजसारख्या बलाढ्य संघाचा धुव्वा उडवून विश्वकरंडक पटकावला होता. मार्टीन गपटीलपासून केन विलियमपर्यंत सर्वच फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहे. स्फोटक फलंदाजीने गोलंदाजांना रडकुंडीस आणणार्‍या रॉस टेलरने आतापर्यंत २८८ धावा केल्या आहेत. तर मार्टीन गपटीलने २२३
धावा जमवल्या आहे. तर स्विंग गोलंदाजीने प्रभावित करणार्‍या टीम साउदीने आतापर्यंत सात इनिंग्जमध्ये १५ बळींची कमाई केली तर जेकब ओरमने १२ बळी खात्यात नोंदवले आहे.

न्यूझीलँडचा संघ एखाद्या खेळाडूच्या करिश्म्यावर अवलंबून राहणारा संघ नसून सांघिक कामगिरीवर त्यांचा विश्वास आहे. म्हणूनच फारसे विक्रम नावांवर नसतानाही सेमी फायनलपर्यंत पोहचला आहे. या संघाचे क्षेत्ररक्षण कमालीचे असून प्रतिस्पर्धी संघावर सारखे दडपण कायम ठेवत असतात. २५-३० धावा कमी देण्यासोबतच विरोधी संघाच्या १-२ खेळाडूंना धावबाद केले की अर्धा सामना त्यांच्या पॉकेटमध्ये असतो. त्यांना धोका आहे फक्त तो कधीकधी फलंदाजी कोसळण्याचा. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ते कधी कोसळतात हे त्यांनाही कळत नाही. या उणीवेवर मात केली तर हा संघ निश्चितच सशक्त आहे.

श्रीलंकेची फलंदाजी कागदावर दमदार भासते मात्र सलामीस तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा, यानंतर कर्णधार कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्याशिवाय इतर फलंदाज कुचकामी आहेत. दिलशान विश्वकरंडकात सात डावांत ३९४ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजात दुसर्‍या क्रमांकावर आहे. कर्णधार कुमार संगकारा याने सहा डावांत ३६३ धावा कुटल्या आहेत. यांच्या दमदार खेळामुळे फलंदाजीतील इतर उणीवांवर पांघरून पडले. थीलन समरवीरा आणि चामरा स्लिव्हा हे फलंदाजीतील कच्चे दुवे आहेत. समरवीरा या विश्वकरंडकात एकही विश्वास निर्माण करणारी खेळी करू शकलेला नाही. म्हणजे त्यांचे सलामीचे मोहरे टिपले की श्रीलंकेचे काम तमाम, ते मोठी धावसंख्या उभारू शकणार नाहीत आणि गोलंदाजीही इतकी
दिलशान विश्वकरंडकात सात डावांत ३९४ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजात दुसर्‍या क्रमांकावर आहे. कर्णधार कुमार संगकारा याने सहा डावांत ३६३ धावा कुटल्या आहेत.
खमके नसल्याने लक्ष्याचा बचाव करू शकत नाहीत. वरच्या फळीतील फलंदाजांनी दमदार कामगिरी केल्याने ही उणीव प्रकर्षाने जाणवली नाही, मात्र सेमीफायनलसारख्या महत्त्वाच्या मुकाबल्यात प्रतिस्पर्धी संघाने फलंदाजीतील या उणीवेवर वार केल्यास त्यांचे कठिण आहे.

श्रीलंकेची गोलंदाजी कमजोर आहे. लसीथ मलींगा आणि अजंता मेंडीस समाधानकारक कामगिरी करत आहेत. मुरलीधरणने आतापर्यंत फक्त एकाच सामन्यात चमक दाखवली. महत्त्वाच्या लढतीत त्याला लय सापडली तर ठीक नाहीतर टार्गेट डिफेंड करणे त्यांना अशक्य होईल. हमखास बळी मिळवून देणारा हुकमी एक्का सद्या त्यांच्याकडे नाही. श्रीलंकेचे श्रेत्ररक्षण उच्च दर्जाचे नाही. यामुळे विरोधी संघावर आक्रमक क्षेत्ररक्षण लावून दबाव निर्माण करावा किंवा एकेरी-दुहेरी धावा वाचवाव्यात हे ठरवणे त्यांच्या कर्णधारास कठिण जाईल.

श्रीलंकेची जमेची बाजू म्हणजे सामना श्रीलंकेत आहे. घरगुती मैदानावर खेळण्याचा फायदा निश्चितच त्यांना मिळेल. आणि प्रेमदासा मैदानावरील खेळपट्टी संथ व लो राहत असल्याने त्यापासून न्यूझीलँडला सावध राहावे लागेल. यासोबतच तेथील प्रेक्षकांची साथही श्रीलंकेस लाभेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि विश्वकरंडकातील ही महत्त्वाची लढत असल्याने लढत अटीतटीची होईल, हे नक्की!

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

Syed Mushtaq Ali Trophy: T20 मध्ये गुजरातच्या उर्विलने मोडला पंतचा विक्रम,सर्वात जलद शतक झळकावले

PAK vs SL: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे श्रीलंकेचा संघ परतला

Show comments