Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचे पानिपत आणि पराभूत मा‍नसिकता

मनोज पोलादे
कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत सलग दोन टेस्ट गमावल्या नव्हत्या, आणि एकही मालिका गमावली नव्हती. मात्र इंग्लंडच्या दौर्‍यावर पोहचताच भारतावर सलग दोन कसोटी हरण्याची नामुष्की ओढवली. झहीर, सेहवाग, गंभीरची अनुपस्थिती हे यासांठी प्रमुख कारण असले तरी धोनीचे नेतृत्वही यासांठी कारणीभूत आहे.
कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत सलग दोन टेस्ट गमावल्या नव्हत्या, आणि एकही मालिका गमावली नव्हती. मात्र इंग्लंडच्या दौर्‍यावर पोहचताच भारतावर सलग दोन कसोटी हरण्याची नामुष्की ओढवली.


लॉर्ड्स पराभवात ऑफस्पिनर हरभजनसिंहचे पितळ उघडे पडल्यानंतरही धोनीने नॉटींघम कसोटीत लेगस्पिनर अमित मिश्रास बाहेर ठेवत हरभजनला खेळवण्याचा अट्टाहास चांगलाच नडला. हरभजनने ट्रेंट ब्रिज येथील दुसर्‍या कसोटीत विकेट्स घेणे तर दुरच आपला गोलंदाजीचा कोटाही पूर्ण केला नाही आणि अगोदरच थकलेल्या वेगवान गोलंदाजांवर अतिरिक्त बोझा पडला. हरभजनने केवळ १३ षटक् गोलंदाजी केली.

कर्णधार धोनीने स्वत: दोन्ही कसोटीत फलंदाजीत कोणतेच योगदान दिले नाही. फक्त मैदानावर बॅट घेऊन येणे आणि परत जाण्याचीच औपचारिकता त्याने पूर्ण केली. यष्टिरक्षणातही त्याने गचाळ कामगिरी केली. याविरूद्ध इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज मॅट प्रॉयरने दोन्ही डावांत दमदार फलंदाजी करून इंग्लंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. यष्टिमागेही त्याचे प्रदर्शन उत्तम राहिले.

भारतीय संघाने इंग्लंडमध्ये लॉर्ड्स आणि नॉटींघम या दोन्ही कसोटीत पराजित मानसिकतेने खेळ केला. वेगवान गोलंदाजांनी आश्वासक कामगिरी केली मात्र फलंदाजांनी सपशेल निराशा केली. झहीर, सेहवाग, गंभीर नाही म्हणजे आम्ही जिंकणारच नाही, इतकेच काय की आम्हांस 'ड्रॉ' करणेही शक्य नाही, असेच त्यांच्या मैदानावरील हालचा
भारतीय संघाने इंग्लंडमध्ये लॉर्ड्स आणि नॉटींघम या दोन्ही कसोटीत पराजित मानसिकतेने खेळ केला. वेगवान गोलंदाजांनी आश्वासक कामगिरी केली मात्र फलंदाजांनी सपशेल निराशा केली.
लींमधून जाणवत होते.

भारताच्या इंग्लंडमधील पानिपतास भारतीय संघाची पराभूत मानसिकताच कारणीभूत ठरली. अन्यथा जगातिल सर्वौत्कृष्ट फलंदाजी म्हणून मिरवणार्‍या भारतास सामने 'ड्रॉ' करणे कठिण नव्हते. लॉर्ड्स कसोटीत त्यासाठी फक्त दिड दिवस तर नॉटींघम कसोटीत तितकाच वेळ फलंदाजी करायची होती. सचिन, द्रविड, लक्ष्मन यासारख्या फलंदाजांना ४७८ धांवा करणे काही अशक्य कोटीतील गोष्ट नव्हती. कारण नॉटींघम येथील खेळपट्टी तेव्हा फलंदाजीस अनुकुल झालेली होती. इंग्लंडच्या गोलंदाजांनीसुद्धा शतकांपर्यंत मजल मारली आणि भारतीय मारा अक्षरश: फोडून काढला, यातूनच हे सिद्ध होते. दोन्ही कसोटीत भारतीय फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी केली असती तर विजयी लक्ष गाठणे सोडा निदान सामने 'ड्रॉ' तरी करता आले असते. आणि याअगोदर निष्प्रभ हरभजनऐवजी अमित मिश्राचा संघात समावेश केला असता तर भारत धावांच्या डोंगराखाली दबलाच नसता.
दोन्ही कसोटीत भारतीय फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी केली असती तर विजयी लक्ष गाठणे सोडा निदान सामने 'ड्रॉ' तरी करता आले असते. आणि याअगोदर निष्प्रभ हरभजनऐवजी अमित मिश्राचा संघात समावेश केला असता तर भारत धावांच्या डोंगराखाली दबलाच नसता.


भारतीय पराभवास फलंदाजांच्या हाराकीरीसोबतच कर्णधार धोनीची गचाळ कामगिरी आणि निर्णयही कारणीभूत ठरले आहेत. कारण रणक्षेत्रावर उतरल्यानंतर योद्धे सेनापतीपासून प्रेरणा घेऊन मैदान मारत असतात. सेनापतीने पराक्रम गाजवल्यास त्यांचेही रक्त निकराची झुंज देण्यासाठी सळसळत असते. मात्र सेनापतीच मैदान सोडून पळाला तर त्याची सेना काय करणार, मग भलेही ते कितीही पराक्रमी असो. सेनापतीने मैदानातून पळ काढणे म्हणजे पराभव निश्चित हे समीकरण इतिहासकाळापासून वास्तव बनले आहे. धोनीने दोन्ही कसोटीत त्वेषाने लढण्यापेक्षा मैदानातून पळ काढल्याचे तमाम भारतीयांनी बघितले. खेळात जय-पराजय चालायचाच, मात्र पराजयही सन्मानजनक असावा. भारताने दोन्ही कसोटीत स्विकारलेल्या
सेनापतीने मैदानातून पळ काढणे म्हणजे पराभव निश्चित हे समीकरण इतिहासकाळापासून वास्तव बनले आहे. धोनीने दोन्ही कसोटीत त्वेषाने लढण्यापेक्षा मैदानातून पळ काढल्याचे तमाम भारतीयांनी बघितले.
पराभवासारखा लाजीरवाना नसावा!

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

श्रेयस अय्यरला काही सामने खेळूनही आयसीसी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून नामांकन मिळाले

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स गोलंदाजीतील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करतील

माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांचा भाजप मध्ये प्रवेश

GT vs RR Playing-11: आयपीएल सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांसमोर, प्लेइंग 11 जाणून घ्या

चेन्नई सुपर किंग्जचा सलग चौथा पराभव, पंजाबने पहिला विजय मिळवला

Show comments