Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वॉवरिन्काचा नदालवर सनसनाटी विजय

वेबदुनिया
WD
आपला ज्येष्ठ सहकारी रॉजर फेडररच्या पराभवाची परतफेड करत स्वीत्झर्लंडच्या स्टॅनिस्लास वॉवरिन्काने स्पेनच्या रफाएल नदालचे कडवे आव्हान परतावून लावत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

मेलबर्न पार्क टेनिस कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नदालच विजयी ठरणार, अशी शक्यता जाणकारांनी वर्तवली होती. पण यंदा विशेष फॉर्ममध्ये असलेल्या वॉवरिन्काने अंतिम फेरीत मजल मारताना नोवॅक जोकोविक आणि टॉमस बर्डीचवर खळबळजनक विजय मिळवले होते. पहिले दोन सेट जिंकल्यानंतर नदालने तिसरा सेट जिंकून सामन्यात रंगत आणण्याचा प्रय▪केला; पण वॉवरिन्काने चौथा सेट जिंकून नदालवर ६-३, ६-२, ३-६, ६-३ असा विजय मिळवत नदालचे १४वे ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न उद्ध्वस्त केले.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पराभवाविषयी बोलताना नदालच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तो म्हणाला, पाठदुखीच्या त्रासाने अचानक सुरुवात केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घालणे केवळ अशक्य होते. तो पुढे म्हणाला, पहिल्या सेटदरम्यानच मला दुखण्याचा त्रास जाणवू लागला होता. या सेटच्या अखेरीस हे दुखणे वाढले. दुसर्‍या सेटदरम्यान ते वाढतच गेले. याचवेळी त्याने वैद्यकीय मदत मागवून घेतली. त्यामुळे त्याच्या खेळात काहीसा फरक जाणवला, मात्र त्याचा वेग मंदावला आणि सर्व्हिसमधील जोरही कमी झाला. अंतिम सामना असल्यामुळे त्याने माघार घेण्याचे टाळले. वर्षभर ज्या क्षणासाठी अविरत मेहनत घेतली तो क्षण येऊन ठेपल्यावर आता आपल्याला यश मिळणार नाही, असे जेव्हा कळते तेव्हा डोळे पाणावतात, असे तो भावनाविवश होऊन म्हणाला.

ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धांच्या विजेतेपदावर हुकूमत गाजवणारे रॉजर फेडरर, नदाल, नोवॅक जोकोविक आणि अँण्डी मरेची 'दादागिरी' संपुष्टात आणणारा स्टॅनिस्लास वॉवरिन्का हा दुसरा टेनिसपटू आहे. यापूर्वी २00९ साली जुऑन मार्टिन डेल पोट्रोने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

२८ वर्षीय वॉवरिन्का म्हणाला, रॉजर फेडरर अनेक ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकत असताना मी पाहिल्या आहेत. त्या वेळी माझ्या मनात प्रश्न उपस्थित व्हायचा की मी कधी विजयी होणार? कारण गेल्या दहा वर्षांत फेडरर, नदाल, जोकोविक आणि मरे यांच्यापैकी एक विजेता ठरत होता. तो असेही म्हणाला की, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मी पटकावले आहे, यावर माझा विश्‍वासच बसत नाही. आता मी गेल्या दोन आठवड्यांत कसा खेळलो, याचा विचार करणार आहे. नदाल जरी तंदुरुस्त नव्हता तरीही हे विजेतेपद माझ्यासाठी मोलाचे आहे. मुख्य म्हणजे मीच या जेतेपदाचा दावेदार आहे. कारण याआधीच्या सामन्यात विश्‍वक्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या जोकोविकला मी पराभूत केले होते.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

Show comments