भारताचे स्टार शटलर्स एचएस प्रणॉय आणि लक्ष्य सेन मंगळवारी जपान ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) च्या ताज्या जागतिक क्रमवारीत अनुक्रमे नवव्या आणि 11व्या स्थानावर पोहोचले. प्रणॉयची एक स्थानाची प्रगती झाली आहे, तर सेनच्या क्रमवारीत दोन स्थानांनी सुधारणा झाली आहे.
प्रणयला मागच्या आठवड्यात टोक्योत जपान ओपनच्या उपांत्यफेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनकडून तर सेनला इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीकडून पराभव पत्करावा लागला. माजी जागतिक नंबर वन किदाम्बी श्रीकांतने 19व्या स्थानावर तर राष्ट्रीय चॅम्पियन मिथुन मंजुनाथने चार स्थानांनी प्रगती करत 50व्या स्थानावर पोहोचले आहे.
ऑलम्पिक मध्ये दोनवेळच्या विजेती पीव्ही सिद्धू 17 व्या स्थानावर आहे. तर पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी दुसऱ्या क्रमांकावर आहे. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने दोन स्थानांची प्रगती करत 17व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.