Festival Posters

महाराष्ट्राच्या बापू कोळेकरला आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्य

Webdunia
गुरूवार, 27 जुलै 2017 (11:26 IST)
महाराष्ट्राच्या बापू कोळेकरने आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावून चमकदार कामगिरी केली आहे. थायलंडमधील बॅंकॉक येथे जागतिक कुस्ती महासंघ आणि आशियाई कुस्ती संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेतील कॅडेट गटात (54 किलो) ही कामगिरी केली.
 
बापू कोळेकरला ग्रीको रोमन प्रकारातील उपान्त्य फेरीत पराभव पत्करावा लागला. बापू कोळेकर हा मूळ सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळजवळील आरेवाडी या गावचा रहिवासी असून सांगलीजवळील आटपाडी येथील वीर हनुमान कुस्ती केंद्र येथे सराव करतो. त्याला नामदेव बडरे व त्यांचे बंधू यांचे मार्गदर्शन लाभते.
 
बापू कोळेकरच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, काका पवार, मारुती आडकर व संपत साळुंखे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Central Railway Mega Block प्रवाशांनो, कृपया नोंद घ्या! रविवारी मध्य रेल्वेच्या या तीन मार्गांवर मेगा ब्लॉक

LIVE: रविवारी मध्य रेल्वेच्या या तीन मार्गांवर मेगा ब्लॉक

शरद पवार गटाचे नेते विकास लावंदे यांच्यावर हल्ला, शाईफेक आणि जीवे मारण्याची धमकी

डब्ल्यूएफआयने विनेश फोगटला कारणे दाखवा नोटीस बजावली

सातारा : लहान मुलाकडून चुकून सुटलेल्या हँडब्रेकमुळे टेम्पो उलटला; एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments