Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बार्सिलोना एल-क्लासिकोमध्ये पराभूत झाला, रियल मैड्रिड 3-1 च्या विजयासह लीगच्या शीर्षस्थानी पोहोचला

Webdunia
सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (09:30 IST)
स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल मैड्रिड ने रविवारी (१६ ऑक्टोबर) ला लीगामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोनाचा 3-1 असा पराभव केला. या विजयासह रिअलचा संघ लीगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे नऊ सामन्यांतून 25 गुण आहेत. लीगमध्ये त्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी आठ विजय मिळवले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. या पराभवानंतर बार्सिलोनाचा संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. नऊ सामन्यांमधला त्याचा हा पहिला पराभव आहे. बार्सिलोनाने सात सामने जिंकले आणि एक अनिर्णित राहिला.
 
कर्णधार करीम बेन्झेमाने रियलसाठी सामन्यातील पहिला गोल केला. त्यानंतर फेडेरिको व्हॅल्व्हर्डेने दुसरा आणि रॉड्रिगोने तिसरा गोल केला. रिअलविरुद्धचा पराभव बार्सिलोनासाठी खूप गंभीर आहे. मॅनेजर झेवी हर्नांडेझचा संघ आधीच UAEFA चॅम्पियन्स लीगमधून बाद होण्याच्या मार्गावर आहे. इंटर मिलानविरुद्धच्या मागील सामन्यात अनिर्णित राहिल्यानंतर चॅम्पियन्स लीगमधील संघाची स्थिती नाजूक आहे.
 
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments