Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हरमनप्रीत आणि पीआर श्रीजेश यांचे FIH हॉकी वार्षिक पुरस्कारासाठी नामांकन

Webdunia
बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (10:42 IST)
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन केले आहे. त्याचवेळी, माजी गोलरक्षक पीआर श्रीजेश याला वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या दोघांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या शानदार मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आणि संघाला कांस्यपदक मिळवून दिले.

कर्णधार हरमनप्रीतने या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 10 गोल केले होते. तो या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. हरमनप्रीतशिवाय या पुरस्काराच्या शर्यतीत थियरी ब्रिंकमन (नेदरलँड्स), जोप डी मोल (नेदरलँड्स), हॅनेस मुलर (जर्मनी) आणि झॅक वॉलेस (इंग्लंड) यांचा समावेश आहे.
 
 शेवटच्या स्पर्धेत खेळताना, अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलकीपिंग केले. भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. त्याचवेळी श्रीजेशची स्पर्धा पिरमिन ब्लॅक (नेदरलँड्स), लुईस कॅलझाडो (स्पेन), जीन पॉल डॅनेनबर्ग (जर्मनी), टॉमस सँटियागो (अर्जेंटिना) यांच्यात आहे.
वेबसाइटवर यादी जारी करताना, FIH ने सांगितले - नामनिर्देशित व्यक्तींची निवड एका विशेष समितीने केली आहे ज्यामध्ये प्रत्येक महाद्वीपीय महासंघाने निवडलेले खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी यांचा समावेश आहे.
 
राष्ट्रीय संघटनांसाठी (त्यांच्या संबंधित राष्ट्रीय संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक प्रतिनिधित्व करतात), चाहते, खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि माध्यमांसाठी मतदान प्रक्रिया 11 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींच्या समर्थनार्थ VBA आंदोलन, 25 कामगार अडकले

अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा काँग्रेस नेत्यांना अपशब्द वापरले

'राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा', परदेशात केलेल्या वक्तव्यावर रामदास आठवले भडकले

भिवंडीत गणपती विसर्जनाच्या दगडफेक यामुळे दोन गटात हाणामारी, पोलिसांनी केला लाठीचार्ज

पुढील लेख
Show comments