Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hockey : भारताने पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद पटकावले

Webdunia
रविवार, 3 सप्टेंबर 2023 (10:18 IST)
पुरुष हॉकी फाइव्ह आशिया कपमध्ये आशियातील अव्वल संघ आमनेसामने होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी झाला. टीम इंडियाने हा सामना जिंकून चषक जिंकला. या स्पर्धेतील तीन सामन्यांमधला भारतीय संघाचा हा पहिला विजय ठरला
 
भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा रोमहर्षक शूटआऊटमध्ये 2-0 असा पराभव करून पहिला हॉकी 5 आशिया चषक जिंकला आहे. निर्धारित वेळेनंतर स्कोअर 4-4 असा बरोबरीत होता. या विजयासह भारताने FIH हॉकी 5 विश्वचषक 2024 मध्येही प्रवेश केला. भारताकडून मोहम्मद राहिल (19वे आणि 26वे), जुगराज सिंग (7वे) आणि मनिंदर सिंग (10वे मिनिट) यांनी निर्धारित वेळेत गोल केले. तर गुरजोत सिंग आणि मनिंदर सिंग यांनी शूटआऊटमध्ये गोल केले.

पाकिस्तानकडून अब्दुल रहमान (५वा), कर्णधार अब्दुल राणा (13वा), झिकारिया हयात (14वा) आणि अर्शद लियाकत (19वा) यांनी निर्धारित वेळेत गोल केले. याआधी शनिवारीच भारताने उपांत्य फेरीत मलेशियाचा 10-4 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पाकिस्तानने पहिल्या उपांत्य फेरीत ओमानचा 7-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. स्पर्धेतील एलिट पूल स्टेज सामन्यात भारताला पाकिस्तानकडून 4-5 असा पराभव पत्करावा लागला होता. भारताकडून उपांत्य फेरीत मोहम्मद राहिल (नववे, 16वे, 24वे, 28वे मिनिट), मनिंदर सिंग (दुसरे मिनिट), पवन राजभर (13वे मिनिट), सुखविंदर (21वे मिनिट), दीपसन तिर्की (22वे मिनिट), जुगराज सिंग यांनी बाजी मारली. (23वे मिनिट) आणि गुरजोत सिंग (29व्या मिनिटाला) यांनी गोल केले. मलेशियाकडून कर्णधार इस्माईल आसिया अबू (चौथे मिनिट), अकाहिमुल्ला अन्वर (सातवे, 19वे मिनिट), मोहम्मद दिन (19वे मिनिट) यांनी गोल केले.
 
फाइव्ह आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाने हा सामना 6-4 असा जिंकला. 
 



Edited by - Priya Dixit    
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

Year Ender 2024: भारतातील सुंदर ठिकाणे जी सेलिब्रिटींची पहिली पसंती ठरली

LIVE: शरद पवार पक्षात काही मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात

प्रेयसीसाठी डायमंड जडलेला चष्मा ऑर्डर केला, 13 हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने केली 21 कोटींची फसवणूक

शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट शिवसैनिकांनीच रचला होता का? पोलिसांनी दोघांना अटक केली

एकनाथ शिंदे आणि पंतप्रधानांच्या भेटीवरून चर्चेचा बाजार, काय म्हणाले उपमुख्यमंत्री जाणून घ्या

पुढील लेख
Show comments